America Court News: अमेरिकेन कोर्टानं भारतीय वंशाच्या दोन भावांना सुनावली तब्बल 835 वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण?

biggest fraud case US court : एकीकडे इराण-इस्त्रायल वादात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. याचदरम्यान, अमेरिकेतून एक सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणून समोर येत आहे.
America Court .jpg
America Court .jpgSarkarnama
Published on
Updated on

America News : एकीकडे इराण-इस्त्रायल वादात अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. याचदरम्यान, अमेरिकेतून एक सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणून समोर येत आहे. पेनसिल्व्हेनिया येथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय वंशाच्या दोन भावांनी केलेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. घोटाळा सिद्ध झाल्यानंतर आता अमेरिकन कोर्टानं या दोन भावांना मिळून एकूण 835 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

पेनसिल्व्हेनिया येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या भास्कर सावनी आणि अरुण सावनी या भावांनी वर्षानुवर्षे अनेक प्रकरणात फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. या दोन भावांनी अमेरिका सरकारच्या मेडिकेड आरोग्य विमा कार्यक्रम आणि H-1B व्हिसा प्रणाली या अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं तपासात समोर आलं आहे.

आरोपी भास्कर सावनी आणि अरुण सावनी यांनी मोठ्या पदांवर असणाऱ्या लोकांसोबत फोटो काढून समाजात आपलं वेगळं वजन निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. पण आता या दोन भावांचे फसवणुकीचे एकापाठोपाठ एक प्रकरणं बाहेर येत आहे. पण आता या प्रकरणामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिकन न्यायालयानं भास्कर सावनी (60) आणि अरुण सावनी (वय 58) या दोन भावांनी अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. यात आता व्हिसा फसवणूक, आरोग्यसेवा, मनी लाँडरिंग आणि करचोरी अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले आहे.

America Court .jpg
Chandrakant Patil News : मुलींना मोफत शिक्षण नाकारणारे कॉलेजेस राज्य सरकारच्या रडारवर : चंद्रकांत पाटील यांचा कडक इशारा

भास्कर आणि अरुण या बंधूंनी सावनी ग्रुप नावानं सुरू केलेल्या कंपनीमार्फत व्यवसायाचं मोठं जाळं उभारलं होतं. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गेले कित्येक वर्षे गैरमार्गांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली होती. अत्यंत शिताफीनं त्यांनी हा घोटाळा सावनी बंधूंनी केल्याचं अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी सांगितलं आहे.

अमेरिकेन कोर्टाकडून आता या प्रकरणी सावनी बंधूंना अत्यंत कठोर शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात अमेरिकन कोर्ट भास्कर सावनी 420 वर्षे तसेच अरुण सावनी यांना 415 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची शक्यता आहे. या दोन्ही भावांची शिक्षा एकत्र केल्यास ती तब्बल 835 वर्षांपर्यंत पोहोचू शकतं.

America Court .jpg
Ramai Awas Scam : एकनाथ शिंदेंचे पिवळे रेशन कार्ड, फडणवीस अनुसूचित जातीमध्ये; रमाई अवास योजनेत घोटाळा,जलील यांनी थेट पुरावेच दाखवले

अमेरिकन कोर्ट याप्रकरणी अंतिम शिक्षा जुलै 2026 मध्ये सुनावणार आहे.यात भास्कर सावनी 8 जुलै आणि अरुण सावनी यांच्यासाठी 9 जुलै ही सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या त्यांच्या सहकारी अलेक्झांड्रा राडोमियाक हिलाही दोषी ठरवण्यात आले असून तिलाही 40 वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि मोठ्या दंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com