Marathwada News : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्कर खतगावकरअडचणीत सापडले आहेत. एका प्रकरणात न्यायालयाने खतगांवकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नायगाव तालुक्यातील नरसी (जिल्हा नांदेड ) येथील तुळजाभवानी सहकारी जिनिंग व प्रोसेसिंग सहकारी संस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी खतगावकर व भुजंग कदम यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए.टी. गिते यांनी रामतीर्थ पोलिसांना दिले आहेत.
फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुक तोडांवर असतांना भास्कर खतगावकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार असल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणार आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. खतगावकर व भुजंगराव कदम हे तुळजाभवानी सहकारी जिंनिग व प्रोसेसिंग सहकारी संस्थाचे चेअरमन नसताना व सचिव नसतांना त्यांनी बीएसएनएलशी तडजोड करून फुसवणुक केल्याची तक्रार विद्यमान चेअरमन श्रीवण पाटील भिलवंडे यांनी केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तेव्हा चेअरमन गोविंदराव भोसले व सचिव चंद्रकांत श्रीरामवार कार्यरत होते. परंतु संगनमताने जागा विक्री आणि मावेजा अशी 17 लाखांची तडजोड करण्यात आली असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते. भास्कर पाटील खतगावकर व कदम यांनी बीएसएनएल सोबत तडजोड करून संस्थेची फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम दर्शनी माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर व भुजंगराव रामराव कदम यांनी ते संस्थेशी त्यांच्या कोणताही संबंध व अधिकार नसताना बीएसएनएल बरोबर तडजोडी साठी पत्रव्यवहार केला. यातून त्यांनी संस्थेची फसवणूक केल्याचे दिसून येते असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आदेश रामतीर्थ पोलिस ठाण्याला देण्यात आले आहेत.
न्यायालयाने हा आदेश गुरुवारी (ता. 4) दिले आहेत. भास्कर पाटील खतगावकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. या प्रकरणी माध्यमांशी बोलताना खतगावकर म्हणाले, हा कुठलाही अपहार नाही, संस्थेच्या हितासाठी हा निर्णय घेतला. बीएसएनएलकडून नऊ लाख दहा हजार येणे होते. त्यात तडजोड करून 17 लाख रक्कम ठरली, ही रक्कम अद्याप जमा झाली नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
(Edited by Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.