Municipal Council News : राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना मारायला धावले : भोकरदन पालिकेची अब्रु धुळीस; पदासाठी एकमेकांना शिव्यांची लाखोली!

Bhokardan NCP-SP Conflict News : भोकरदन नगरपालिकेत सत्ता मिळूनही राष्ट्रवादीतील गटबाजी, पदलालसा व वादामुळे लोकशाहीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून पालिका कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Bhokardan Municipal Council meeting descends into chaos as NCP-SP councillors clash over committee posts, highlighting internal factionalism despite holding power.
Bhokardan Municipal Council meeting descends into chaos as NCP-SP councillors clash over committee posts, highlighting internal factionalism despite holding power.Sarkarnama
Published on
Updated on

Bhokardan NCP-SP News : भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसची 10 वर्षापासूनची सत्ता उखडून टाकली. भाजपला रोखत बहुमतासह नगरपालिकाचा कारभार हाती घेतला. नगराध्यक्षपदावर अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देत सामाजिक समीकरण जुळवल्याबद्दल स्वतःची पाठही थोपटून घेतली. पण स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडीवरून सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष उफाळून आला.

नगरपालिकेच्या सभागृहातच सत्ताधारी नगरसेवक एकमेकांवर धावून गेले, अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ कानी पडत असल्याने महिला नगरसेवकांची मान शरमेने खाली गेली. गेल्या कित्येक वर्षात नगरपालिकेत असे चित्र कधी दिसले नव्हते. सत्ता परिवर्तन हे आधीच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा चांगले काम आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी असते. पण सत्तेच्या उन्मादात जनतेचे सेवक असणाऱ्यांना मात्र याचा विसर पडल्याचे दिसून आले. भोकरदन पालिकेची अब्रु या प्रकाराने अक्षरशः धुळीस मिळाली.

भोकरदन नगरपालिकेचे सभागृह सोमवारी लोकशाहीचे मंदिर न राहता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अंतर्गत भांडणांचा आखाडा बनले होते. पदांचा हव्यास, गटबाजी आणि अहंकार यांचा स्फोट होताच सत्ताधारी नगरसेवक एकमेकांवर तुटून पडले. सभागृहात उघडपणे शिवीगाळ, आरडाओरडा आणि गलिच्छ राजकारणाचे दर्शन पाहता हेच का आपण निवडून दिलेले नगरसेवक? असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.

या गोंधळामुळे स्थायी व विशेष विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे कोसळली. सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेली विशेष सभा सुरू होताच सत्ताधारी गटातील वाद पेटले. प्रशासन सज्ज होते, अधिकारी उपस्थित होते, मात्र सत्ताधारी स्वत:च कारभार चालवण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले. सभागृहात झालेल्या शिव्यांच्या भडीमारामुळे उपस्थित महिला नगरसेवकांना खाली मान घालण्याची वेळ आली.

Bhokardan Municipal Council meeting descends into chaos as NCP-SP councillors clash over committee posts, highlighting internal factionalism despite holding power.
BJP Jalna politics : जालना महापालिकेत गटनेते, प्रतोद जाहीर; भाजपने दानवे- गोरंट्याल गटात साधला समतोल!

जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून आलेल्या महिलांसमोर पुरुष सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या नशेत सभागृहाची गरीमा, नियमच पायदळी तुडवले. हा प्रकार केवळ लाजिरवाणा नाही, तर राजकीय इतिहासावर काळा डाग असल्याची चर्चा या प्रकारानंतर सुरू झाली आहे. स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीतील गट आमनेसामने उभे ठाकले. 'बांधकाम समिती आमचीच' या हट्टातून वाद विकोपाला गेला.

21 नगरसेवकांची यादी देऊनही ऐनवेळी भाजपने 2 सभापतीपदांची मागणी करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपची साथ दिल्याने राष्ट्रवादी सत्तेत असूनही निष्प्रभ ठरली. या अभुतपूर्व गोंधळानंतर आता मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागवले जाणार असल्याचे सांगीतले.

Bhokardan Municipal Council meeting descends into chaos as NCP-SP councillors clash over committee posts, highlighting internal factionalism despite holding power.
Bhokardan Assembly Election : विरोधकांकडे विकासाचे व्हिजनच नाही : संतोष दानवे

चंद्रकांत दानवे लक्ष घालतील का?

गटनेते शफिक पठाण, अजहर अली शाह व इतर नगरसेवकांमध्ये एकाच बांधकाम समितीसाठी उफाळलेला वाद इतका टोकाला गेला की सभागृहात बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. त्यामुळे सत्तेचा जल्लोष करण्यासाठी आणलेले हार-तुरे वापरण्याआधीच सत्ताधाऱ्यांची अब्रु वेशीला टांगली गेली.

त्यामुळे कोणताही निर्णय न घेता सभा तहकुब करावी लागली. हाती सत्ता असूनही निर्णय घेता येत नाही, हे सत्ताधारी राष्ट्रवादीचे अपयश असल्याची टीका आता विरोधकांकडून होऊ लागली आहे. या प्रकाराची दखल माजी आमदार चंद्रकांत दानवे किती गांभीर्याने घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com