Bazar Samiti Election : चव्हाणांच्या नांदेडमध्ये काँग्रेस, भाजपची युती : राष्ट्रवादीलाच घेरले

BJP & Congress : काँग्रेस आणि भाजप यांच्यात कधीच युती होऊ शकत नाही, असा ठोकताळा सर्वांचा होता.
Pradeep Naik, Bhimrao Keram, Namdevrao Keshave News
Pradeep Naik, Bhimrao Keram, Namdevrao Keshave NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

साजीद खान

Nanded News : देशात कोणताही पक्ष एकत्र येऊ शकतो, मात्र काँग्रेस आणि भाजप यांच्यात कधीच युती होऊ शकत नाही, असा ठोकताळा सर्वांचा होता. मात्र, ही समज आता संपुष्टात आली असून, भाजप आणि काँग्रेस यांनी माहूर किनवटमध्ये युती करून नवीन राजकीय समीकरण जन्माला घातले आहे. अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने बाजार समितीत आपल्या कट्टर विरोधक भाजपसोबत युती केली आहे.

माहूर तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, जिल्हा बँकेचे संचालक व माहूर नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे नगरसेवक असलेले प्रा. राजेंद्र केशवे, युवक काँग्रेसचे सचिव डॉ. निरंजन केशवे यांच्या अर्थातच केशवे घराण्याच्या पुढाकाराने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसने भाजपसोबत संसार थाटला आहे. एका बाजूने राज्यातील व देश भारातील भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्षातील संघर्ष पराकोटीला पोहोचला असताना, त्याचवेळी किनवट माहूरमध्ये अनपेक्षित युत्याही करण्यात येत आहे.

Pradeep Naik, Bhimrao Keram, Namdevrao Keshave News
Ramraje Nimbalkar News : रामराजे विरोधकांवर भडकले; म्हणाले, "आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर...

त्यामुळे राजकारणात काय होऊ शकते याचा अंदाज लावणे सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पुढे गेले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपसोबत युती करत असताना काँग्रेस नेत्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात घेतले असेलच, असा कयास बांधला जात आहे. माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ची सत्ता होती. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी शिंदे शिवसेना व काँग्रेससोबत शेतकरी शेतमजूर बळीराजा पॅनेलची निर्मिती केली आहे.

या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे व माजी आमदार प्रदीप नाईक यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. विद्यमान आमदार खासदार यांच्या पक्षाने काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येत बळीराजा शेतकरी विकास पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे खासदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम या विभागाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव राव केशवे तर राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे गणित याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर अवलंबून आहे.

किनवट माहूर विधानसभेचा मागील चार पंचवार्षिक निवडणुकीचा इतिहास बघितल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघात विळा भोपळ्याचे सौख्य असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत जुळल्याचे दिसून आले नाही. मात्र, देशभरात 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस सोबत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी असलेल्या प्रादेशिक पक्षांनी वज्रमूठ बांधत लोकसभा निवडणुकीपूर्वी एल्गार पुकारला असताना अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने भाजपसोबत सलगी करणे अनेकांच्या पचनी पडले नसल्याने या अभद्र युतीचा भाजप, काँग्रेसला काय नफा नुकसान होणार हे येत्या आठ ऑक्टोबर रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Pradeep Naik, Bhimrao Keram, Namdevrao Keshave News
Aditya Thackeray On Fadnavis: भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला; आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com