Aditya Thackeray and Devendra Fadnavis
Aditya Thackeray and Devendra FadnavisSarkarnama

Aditya Thackeray On Fadnavis: भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला; आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

BJP and Thackeray group : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाघनखांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Published on

Chhatrapati Sambhaji Nagar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाघनखांवरून राजकीय वादळ उठल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप व शिवसेना ठाकरे गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आता खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना बालबुद्धी म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांच्या टीकेमुळे भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे.

लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. ती वाघनखं १६ नोव्हेंबरला मुंबईत आणली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याआधीच सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले होते. आता देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Aditya Thackeray and Devendra Fadnavis
Ramraje Nimbalkar News : रामराजे विरोधकांवर भडकले; म्हणाले, "आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर...

"खासदार संजय राऊत यांच्या बोलण्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाच पुरावे मागितले होते. त्यामुळे ही त्यांची परंपरा आहे,'' तर आदित्य ठाकरेंवर बोलताना फडणवीस म्हणाले की,"मी बालबुद्धीवर काय बोलणार, त्यामुळे यावर मी उत्तर देत नाही", असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमासाठी आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेने त्यांनी भाजपचा चेहराच सर्वांसमोर आणला आहे. बाळ हे तर माझ्या आजोबाचे नाव आहे. त्यामुळे यामध्ये वावगे वाटण्यासारखे काहीच कारण नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Edited By- Ganesh Thombare

Aditya Thackeray and Devendra Fadnavis
Pune Congress Politics : काँग्रेस आपलाच पारंपरिक मतदारसंघ विसरली अन् भाजपने संधी साधली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com