Imtiaz Jaleel: "आम्हाला जातीयवादी म्हणणारे भाजप-सेनेवालेच निवडणुकीनंतर कटोरा घेऊन मदतीसाठी मागेपुढे फिरतात"; इम्तियाज यांचा हल्लाबोल

Imtiaz Jaleel: आधी अकोट आणि आता परळी नगरपालिकेत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्यामुळे एमआयएम आणि महायुतीतील या पक्षांवरही टीकेची झोड उठत आहे.
AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.Sarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jaleel: आधी अकोट आणि आता परळी नगरपालिकेत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेल्यामुळे एमआयएम आणि महायुतीतील या पक्षांवरही टीकेची झोड उठत आहे. अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आल्याच्या बातमीने राज्यभरात खळबळ उडाली होती. दोन्ही पक्षांवर टीकेचा भडीमार झाला.

त्यानंतर दोन्ही पक्षांनी ही युती तोडल्याचे जाहीर केले. आता परळीत एमआयएम आणि महायुती एकत्र आल्याचे समोर आले. पुन्हा एमआयएमवर टीका होऊ लागली. यावर इम्तियाज जलील यांनी भाजप आणि शिवसेनेला सुनावले.

AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
Raj Thackeray: 1952 मध्ये जन्माला आलेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्यानं घ्यावी लगतात! निष्ठावंतांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी भाजपला डिवचलं

आम्हाला जातीयवादी म्हणणारे भाजप, एकनाथ शिंदे हे निवडणुकीत तर आमच्याविरोधात खूप बोलतात. पण निकाल जाहीर झाल्यानंतर कटोरा घेऊन मदतीची भीक मागतात, अशा शब्दात इम्तियाज यांनी हल्ला चढवला. परळी नगरपालिकेत आमचा एकमेव नगरसेवक आहे, त्याला स्वतः अजित पवार यांनी तुमच्या भागात खूप विकास कामे करायची आहे, तेव्हा तुम्ही सोबत या, असे आवाहन केले होते.

आम्ही निर्णय त्या नगरसेवकावर सोपवला होता. आज तेव्हा परळीच्या या आघाडीत शिंदेंची शिवसेनाही सोबत आहे हे समजले, तेव्हा आम्ही कुठल्याही परिस्थितीत या आघाडीत जायचे नाही, असे आमच्या नगरसेवकाला कळवले असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले.

AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
Kolhapur Election: ...मग विरोधक जाहीरनाम्यासाठी निधी आणणार कुठून?; महायुतीच्या नेत्यांची कुरघोडी, कर्तव्यनामा जाहीर

आज एमआयएम भाजप, शिंदेसेनेसोबत कशी गेली? असा प्रश्न जे आम्हाला विचारतात, तो त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांनाही विचारला पाहिजे. एमआयएम जातीवादी पक्ष, असा पक्ष, तसा पक्ष म्हणून टीका करतात मग निवडणूक झाल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या लोकांचा मागे का लागता? अकोटमध्ये तसेच केलं, परळीतही तसेच केले, असा आरोपही त्यांनी केला.

परळीतील विकास आघाडीत एकनाथ शिंदेची शिवसेना असल्याचे कळाल्यानंतर आम्ही यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण एकनाथ शिंदे हे आमच्या नजरेत 'गुस्ताख ए रसूल' आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचे नाही, हा आमचा निर्धार पक्का आहे.

AIMIM leader Imtiaz Jaleel faces attack allegations by party workers during Chhatrapati Sambhajinagar municipal election unrest.
Rohit Pawar: अजित पवार म्हणजे KGF मधील रॉकीभाई! रोहित पवारांनी उधळली स्तुतीसुमनं

आमच्यासाठी हे शहर औरंगाबादच..

महापालिका निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने दाखल केलेल्या अर्जावर छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद असा उल्लेख केला. निवडणुक विभागाने त्याचा अर्ज बाद करायला हवा होता, अशी मागणी मंत्री अतुल सावे यांनी केली.

यावरही इम्तियाज जलील यांनी 'अतुल सावे तुला सांगतो शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे' यांच्याकडे मुद्दे राहिले नाही, तुमचे जे देवाभाऊ आहे ते इकडे आले होते. फुकटचे हंडे घेऊन त्यांच्या महिला नऊवारी साडी घालून महानगरपालिकेसमोर नाचत होत्या. शहराला पाणी आले का? अतुल साहेबांना विचारा, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com