Kolhapur Election: ...मग विरोधक जाहीरनाम्यासाठी निधी आणणार कुठून?; महायुतीच्या नेत्यांची कुरघोडी, कर्तव्यनामा जाहीर

Kolhapur Election: घोषणेची खैरात न करता महायुतीने जाहीर केला कर्तव्यनामा, आयटी हब अन् काँक्रिट रस्ते, ऑनलाईन सुविधा अन् बरंच काही
Hasan Mushrif_Mahayuti Kartavyanama
Hasan Mushrif_Mahayuti Kartavyanama
Published on
Updated on

Kolhapur Election: कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीने कर्तव्यनामा जाहीर केला. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महायुतीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते हे सिमेंट काँक्रीटसह, आयटी पार्क, पंचगंगा स्वच्छता, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे.

Hasan Mushrif_Mahayuti Kartavyanama
Rohit Pawar: अजित पवार म्हणजे KGF मधील रॉकीभाई! रोहित पवारांनी उधळली स्तुतीसुमनं

समस्या सोडवण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, शहरातील सर्व समस्या वेगवान पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणार. शहरवासीयांना जे आवश्यक आहे. त्या गरजा आम्ही पूर्ण करत असल्याचा जाहीरनामा नव्हे तर कर्तव्यनामा आज प्रसिद्ध करत आहे. शहरवासीयांना पारदर्शक प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न, ऑनलाइन सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. निवडून आल्यावर नगरसेवकांनी काय करावे? नेत्यांनी काय जबाबदारी घ्यावी? याचा सूत्रबद्ध कार्यक्रम आम्ही तयार केला आहे, जे जाहीरनाम्यात दिले ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे.

Hasan Mushrif_Mahayuti Kartavyanama
Devendra Fadnavis: बिनविरोध निवडणुकांवर फडणवीसांचा अजब तर्क! म्हणाले, किरीट सोमय्यांच्या मुलाविरोधात...

विरोधक निधी आणणार कुठून?

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. सत्ता का हवी हे लोकांना वारंवार आम्ही सांगितले आहे. जिल्ह्यात दहा आमदार आमचे आहेत. मग विरोधक जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी निधी कुठून आणणार? उगीच आमिष दाखवून, भूलथापा मारून काय होणार आहे? लोकांना फसवू नका, तुमच्याकडून कामं होणार नाहीत. उलट मीच त्यांना सांगितले आहे की? तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, असा टोला लगावला. उद्या मुख्यमंत्री येतील त्यावेळी सांगणार आहे. भविष्यात भूमिगत रस्ते, आणि मेट्रो ची गरज भासणार आहे. येत्या १५ जानेवारीला लोकांचा विश्वास जिंकू, असे मुश्रीफ म्हणाले. थेट पाइपलाइनमध्ये काही त्रुटी आहेत. योजनेचा अभ्यास केला नाही. तेथील हवामान, भौगोलिक स्थिती याचा अभ्यास केला नाही. हे मी मान्य करत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif_Mahayuti Kartavyanama
Nagpur Election: भाजपचा बंडखोरांना मोठा झटका! तब्बल 32 जण एकाचवेळी निलंबित

पंचवीस वर्षे टिकणारे रस्ते

'जे मनात, तेच मनपात' ही टॅगलाईन घेऊन आम्ही महापालिका निवडणुकीत उतरलो आहोत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास केला जात आहे. अंबाबाई मंदिर, महापूर, उड्डाण पूल, बास्केट ब्रिज, आयटी पार्क ही सगळी कामं मंजूर करून आम्ही जनतेसमोर आलो आहोत. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे केले जाणार जे 25 वर्षे टिकतील. सतेज पाटील यांनी इव्हेंट करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण आता जनता फसणार नाही, असे खासदार महाडिक म्हणाले.

Hasan Mushrif_Mahayuti Kartavyanama
Parbhani Municipal Elections : नाती-गोती, जातीपातीचा विचार करू नका, आपलं भलं कशात ते ओळखा! अजित पवारांचा परभणीकरांना विकासाचा वादा

महायुतीच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

  1. योग्य प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन

  2. महापालिका नूतन इमारत

  3. ऑनलाइन सेवा देण्यासाठी यंत्रणा

  4. मनपा क्षेत्रातील प्राथमिक माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन

  5. अंतर्गत ड्रेनेज व्यवस्थापन

  6. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

  7. वाहतूक कोंडीवर उपाययोजना

  8. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा, संगीत महोत्सव

  9. स्टेडियमची पुनर्रचना

  10. सीसीटीव्ही सुरक्षा

  11. पार्किंग व्यवस्था

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com