

Chhatrapati Sambhajinagar Mayor News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदी आज भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौर पदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली. दोघांना प्रत्येकी 70 मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवारांना 33 मते मिळाली. 70 विरुद्ध 33 अशा मतांनी युतीने एमआयएमचा पराभव केला.
महापौरपदाच्या खुर्चीवर बसताच महापौर समीर राजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित पारदर्शक कारभार करण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही दिली. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाण्याचा गॅप कमी करण्याचा प्रयत्न, बेकायदा होर्डींगमुक्त शहराची संकल्पना आणि लोकसहभागातून शहरात कचरामुक्तीसाठी मोहीम सुरू करण्याचा मनोदय नव्या महापौरांनी व्यक्त केला.
महापौरपदाची सूत्रे राजूरकर यांनी आज स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना शहरात सध्या नळाला आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नव्या पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. मी अद्याप आढावा घेतलेला नाही. लवकरच आढावा घेऊन पाण्याचा गॅप कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
इंदूर, अहमदाबाद शहराप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहर देखील स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपले प्राधान्य राहिल. त्यासाठी नगरसेवकांना सोबत घेत लोकसहभागातून स्वच्छतेची मोहीम सुरू करण्याचा आपला प्रयत्न असले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यास आपले प्राधान्य राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची इमेज बदलण्यासाठी येत्या काळात टप्प्या-टप्प्याने निर्णय घेतले जातील. काही उपाय-योजनांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल तर काही योजना दीर्घकालीन असतील. महापालिकेत काटकसर करण्याची सुरवात माझ्या दालनापासून करणार असे स्पष्ट करत नव्या महापौरांनी आपला कारभार कसा असेल? याचे संकेत दिले.
शहरात कोणीही बेकायदा होर्डिंग लावून विद्रुपीकरण करू नये, असे आवाहन राजूरकर यांनी केले. एकही बेकायदा होर्डिंग शहरात दिसता कामा नये, असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत. त्यात माझे देखील होर्डिंग असतील तर ते देखील हटविण्यात यावेत, असे राजूरकर यांनी सांगत कामाला सुरवात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.