ZP Election Result : बाळासाहेब ठाकरेंचं विशेष प्रेम असलेला 'संभाजीनगर' जिल्हा आता भाजपमय; महापालिकेनंतर झेडपीतही जादू कायम!

BJP Zilla Parishad Victory : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असून, महापालिकेनंतर झेडपीतही भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
BJP leaders celebrate as the party secures maximum seats in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad elections, reinforcing its stronghold after the municipal corporation victory.
BJP leaders celebrate as the party secures maximum seats in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad elections, reinforcing its stronghold after the municipal corporation victory.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhahjinagar ZP News : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम असलेला संभाजीनगर जिल्हा आता पूर्णपणे भाजपमय झाला आहे. 2017 नंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप सर्वाधिक 23 जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करत शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत पाठवणाऱ्या भाजपने जिल्हा परिषदेमध्येही हाच करिष्मा करून दाखवला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2017 मध्ये एकत्रित लढून जितक्या जागा जिंकता आल्या नाही त्यापेक्षा तीन जागा म्हणजेच 21 सदस्य निवडून आणत या पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. तरीही नगरपालिका, नगरपंचयात, महापालिका आणि आता जिल्हा परिषदेत मिळालेल्या सर्वाधिक यशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा भाजपमय झाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना मात्र आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. वंचित, एमआयएमला अजूनही ग्रामीण भागात मतदारांनी स्वाकारलेले नाही हे कालच्या निकालातून दिसून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नऊ जागा जिंकत संभाजीनगरमध्ये अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

गेल्या जिल्हा परिषदेत 16 एवढे संख्याबळ आणि अडीच वर्ष अध्यक्षपद असताना या निवडणुकीत मात्र काँग्रेसला केवळ एक जागा जिंकत खाते उघडता आले. जिल्ह्यात नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसची ही दयनीय अवस्था लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातही कायम आहे.

आमदारांची कामगिरी..

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदारांच्या कामगिरीचा विचार केला तर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे महापालिकेनंतर झेडपीच्या निवडणुकीतही आपल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील तीन पैकी एकही जागा त्यांच्या पक्षाला जिंकता आलेली नाही. तर पंचायत समितीच्या सहापैकी फक्त तीन जागा त्यांच्या वाट्याला आल्या आहेत. या निकालामुळे पक्षात शिरसाट यांच्या अडचणी भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पैठणमध्ये भुमरेंचाच आवाज

पैठण विधानसभा मतदारसंघात खासदार संदिपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे या जोडीने नऊ पैकी आठ जिल्हा परिषद आणि 18 पैकी 17 पंचायत समितीच्या जागा जिंकत आपली मजबूत पकड सिद्ध केली. त्यामुळे भविष्यात संभाजीनगर जिल्ह्याच्या शिवसेनेतील राजकारणाचे केंद्र पैठणच्या दिशेने सरकले तर नवल वाटू नये.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात विजय मिळवलेल्या संजना जाधव यांना नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही अपयशाचे तोंड पहावे लागले. कन्नड मधील आठ पैकी केवळ एका जागेवर त्यांच्या पक्षाला यश मिळाले. भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मतदारसंघात मुसंडी मारली. मतदारसंघात संघटनात्मक ताकद कमी झाल्यामुळे याचेही उत्तर पक्षश्रेष्ठींना येणाऱ्या काळात संजना जाधव यांना द्यावे लागणार आहे.

सत्तारांना खुशी कम, गम देणारा निकाल

भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेत सिल्लोड सोयगाव या आपल्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेत एकहाती वर्चस्वराखण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अब्दुल सत्तार यांना या निवडणुकीत काहीसा धक्का बसला आहे. आपला दुसरा मुलगा आमिर सत्तार याला अंभई गटातून निवडून आणत जिल्हा परिषदेत अध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत असलेल्या अब्दुल सत्तार यांना नऊपैकी सहा जागा जिंकता आल्या आहेत

पंचायत समितीत 18 पैकी दहा जागा भाजपने जिंकल्यामुळे सत्तार यांना आठ जागांवर समाधान मानावे लागले. एकहाती सत्ता राखण्याची सवय जडलेल्या अब्दुल सत्तार यांच्यासाठी पंचायत समिती मध्ये भाजपचा भगवा फडकणे पुढील राजकारणासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

BJP leaders celebrate as the party secures maximum seats in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad elections, reinforcing its stronghold after the municipal corporation victory.
ZP Election Results: झेडपी, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच नंबर 1; ग्रामीण भागातही पकड मजबूत

बंब-बोरनारे यांना संमिश्र यश

वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनीही अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणे भाजपशी युती तोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आठ पैकी चार जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपला केवळ एक जागा मिळाली. संमिश्र यश मिळाल्यामुळे त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा अपेक्षित फायदा त्यांना झालेला दिसत नाही.

BJP leaders celebrate as the party secures maximum seats in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad elections, reinforcing its stronghold after the municipal corporation victory.
Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : पक्षात माझी काय लायकी आहे, हे मला माहीत आहे; इम्तियाज जलील यांनी सांगण्याची गरज नाही! संजय शिरसाट यांचा पलटवार

दुसरीकडे भाजपचे गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी नगरपालिका निवडणुकीत झालेल्या अपयशाची भरपाई जिल्हा परिषदेच्या बारा पैकी सात जागा जिंकत भरून काढली आहे. फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनीही मतदारसंघातील 14 पैकी सात जागा जिंकत 50 टक्के यश संपादन केले आहे. आमदारकीची पहिली टर्म असलेल्या अनुराधा चव्हाण यांचे यश मोठे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com