BJP MLC Election Politics : काँग्रेसची साथ सोडणाऱ्या माजी आमदार महिलेला भाजपचे तिकीट; हिंगोली लोकसभा मतदारसंघात जोरदार फिल्डिंग

BJP Marathwada hingoli Lok Sabha Strategy : विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपने आगामी विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
Hingoli Politics, mlc election; pradnya satav
Hingoli Politics, mlc election; pradnya satavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे.

  2. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी देण्यात आली आहे.

  3. हिंगोली लोकसभा मतदारसंघ लक्षात घेऊन भाजप मराठवाड्यात आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

Hingoli BJP News : विधान परिषदेच्या (mlc election) दहा जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पक्षाच्या धक्कातंत्राला साजेशी अशी काही नावे समोर आली आहेत. तर मराठवाड्यातून काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी देण्यात आली आहे. (Pragya Satav BJP nomination update)

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेशच मुळात 2029 मध्ये होणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विचार करून झाला होता अशी चर्चा आहे. आता त्यांना विधान परिषदेवर घेत बळ देण्याचा आणि हिंगोली जिल्ह्यात भाजपचे संघटन वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना पालकमंत्री आणि नुकताच धनगर समाजाचे नेतृत्व करणारे रामराव आडकुते यांना राज्यसभेवर घेत भाजपने हिंगोली लोकसभा मतदारसंघात जोरदार फील्डिंग लावायला सुरूवात केली आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर 1977-80 दरम्यान, जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर आजतागायत या मतदारसंघावर काँग्रेस, शिवसेना या पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूर्यकांता पाटील यांनी 2004 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता. तर सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर हे करत आहेत.

Hingoli Politics, mlc election; pradnya satav
Pradnya Satav MLC : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या प्रज्ञा सातव पुन्हा आमदार होणार? महिन्याभरात पोटनिवडणुकीची शक्यता

राज्यात शिवसेना-भाजपची कायम युती राहिल्यामुळे युतीमध्ये हिंगोलीचा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे असायचा. 2024 मध्ये ही जागा शिंदेच्या शिवसेनेचे बाबुराव कदम यांनी लढवली होती. त्यांचा नागेश पाटील आष्टीकर यांनी पराभव केला होता. गेल्या काही वर्षात भाजपने हिंगोली जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर जिंतूर, हिंगोली हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. इथे अनुक्रमे मेघना बोर्डीकर, तान्हाजी मुटकुळे हे पक्षाचे प्रतिनिधत्व करतात.

गंगाखेड विधासनभा मतदारसंघाचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे आता पूर्णपणे भाजपच्या बाजूने आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत त्यांनी याच पक्षाला उघडपणे मदत केली होती. पाथरी, वसतम विधानसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, राजू नवघरे हे आमदार आहेत. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात दिवंगत खासदार राजीव सातव यांना मानणारा वर्ग भाजपच्या बाजूने वळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापुर्वी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर दुसऱ्यांदा संधी दिली होती. परंतु त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावत भाजपने पक्षात घेतले आणि आता विधान परिषदेची उमेदवारी दिली. हा सगळा खटाटोप 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मराठवाड्यातून विधान परिषदेवर जाणाऱ्या डझनभर इच्छुकांना राज्यातील भाजप नेत्यांनी धक्का दिला आहे. माजी आमदार संजय केनेकर, जालन्याचे कैलास गोरंट्याल, सिल्लोडचे सुरेश बनकर यांनाही उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र प्रज्ञा सातव यांना संधी देत भाजपने इतर नावांवर फुली मारल्याचेही आता समोर आले आहे.

Hingoli Politics, mlc election; pradnya satav
Pradnya Satav : 'त्याच दिवशी राजीवचा पुन्हा एकदा मृत्यू झाला', प्रज्ञा सातव यांच्या जाण्यावर काँग्रेस हळहळली, भाजपवरही हल्ला चढवला

FAQs :

1. भाजपने किती उमेदवारांची यादी जाहीर केली आहे?
भाजपने विधान परिषदेसाठी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

2. प्रज्ञा सातव कोणत्या पक्षातून भाजपमध्ये आल्या?
त्या काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

3. त्यांना उमेदवारी का देण्यात आली आहे?
हिंगोली लोकसभा मतदारसंघ आणि मराठवाड्यात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली आहे.

4. या निर्णयाचा राजकीय अर्थ काय आहे?
हा निर्णय आगामी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे.

5. पुढे काय परिणाम होऊ शकतो?
मराठवाड्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून राजकीय समीकरण बदलू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com