Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणतात, राजकारणातला माणूस कधीच निवृत्त होत नसतो!

Ashok Chavan Reacts On Sharad Pawar Retirement Buzz : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
Sharad Pawar NCP Joining NDA Discussion; Ashok Chavan
Sharad Pawar NCP Joining NDA Discussion; Ashok ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे १२ डिसेंबर म्हणजेच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणार असल्याच्या चर्चांना माध्यमांमधून उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टीकरण देत या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी यावरून राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्यासह अशोक चव्हाण यांनीही शरद पवारांच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेवर भाष्य केले आहे.

राजकारणातला माणूस कधीच निवृत्त होत नसतो, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या चर्चा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. नांदेडमध्ये माध्यमांनी जेव्हा त्यांना या संदर्भात विचारले, तेव्हा चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी आहेत, त्यांना राजकारणाचा छंद आहे. राजकारण हा त्यांचा तो पिंड आहे. ते अनुभवी, मार्गदर्शक आहेत. राजकारणातला माणूस कधी निवृत्त होत नसतो, असेही चव्हाण म्हणाले.

Sharad Pawar NCP Joining NDA Discussion; Ashok Chavan
Ashok Chavan Audio Clip : "तुमचा अख्खा नांदेड जिल्हा माझ्या वाकड्यात.. चव्हाणांसह 5 आमदारांच्या हत्येचा कट" : खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर

शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार का? यावर सावध भूमिका घेत, 'हे त्यांनाच विचारा,' असे म्हणत चव्हाण यांनी भाष्य करणे टाळले. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी व्हावे, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sharad Pawar NCP Joining NDA Discussion; Ashok Chavan
Ashok Chavan : अशोक चव्हाणांसह चार आमदारांना उडवण्याचा कट? खंडणी प्रकरणात मोठी अपडेट; ऑडिओ क्लिपमुळे तपासाला वेग

पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि अन्य नेत्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करावा, असा पर्याय चर्चेत असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपच्या काही नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचाही दावा आहे. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. असे असताना शरद पवार हे १२ डिसेंबर रोजी आपल्या ८६ व्या वाढदिवशी निवृत्तीची घोषणा करतील, अशी चर्चा केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.