Paithan BJP News: हजार महिलांनी पैठणला जावून केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी..

Paithan Water Supply Scheme: नाथसागर ते नक्षत्र वाडी ३९ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीचे आस्तारीकरण काम सुरू आहे.
Bjp News
Bjp News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada : केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने विशेष जनसंपर्क अभियान सुरू आहे. केंद्र सरकारने शहरासाठी २७०० कोटी रुपये खर्च करून अमृत मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे कामे सुरू केले आहे. (Bjp News) विकास तीर्थ यात्रा अभियाना अंतर्गत शहरातील एक हजार महिलांनी पाणी पुरवठा योजनेस भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

Bjp News
Mp Omraje Nimbalkar News : व्यासपीठावरच ओमराजेंकडून `शासन आपल्या दारी`, चा पंचनामा..

सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत महिलांनी ही योजना लवकरात लवकर पुर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डिसेंबर २०२४ पर्यंत चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. (Bjp) महानगरपालिकेच्या नऊ बसमधून शेकडो महिलांनी विकास तीर्थ दौऱ्यात सहभाग नोंदवला. झाल्या होत्या.

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयापासून बसला झेंडा दाखवून पैठणकडे रवाना केले. (Aurangabad) नवीन पाणीपुरवठा योजनेतून (Water Supply Isuue) शहरातील प्रति नागरिकास १३५ लिटर याप्रमाणे एकूण ३२ लाख लोकसंख्येला ६९२ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे चोवीस तास पाणी शहराला मिळणार आहे. सध्या शहराला ११० एमएलडी पाणी मिळते त्यात गळतीचे प्रमाण तीस ते पस्तीस टक्के इतके असल्याने पाण्याची टंचाई सुरू आहे. त्यामुळे अमृत मिशन पाणीपुरवठा योजना ही शहराच्या विकासची लाईफ लाईन ठरणार असल्याचे कराड यांनी सांगितले.

नक्षत्रवाडी येथे सुरू असलेल्या वाटर ट्रीटमेंट प्लांट (जलशुद्धीकरण केंद्र ) कामाची पाहणी देखील यावेळी करण्यात आली. किमान सहा मोठ्या एसटीपी प्लांट मधून ४९२ एमएलडी पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येणार असून बावन्न टाक्याद्वारे पाणी वितरित होणार आहे. नाथसागर ते नक्षत्र वाडी ३९ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीचे आस्तारीकरण काम सुरू असून या ठिकाणीही भेट देण्यात आली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.