BJP News : महापालिकेत भाजपच्या वाट्याला येणार पाच स्वीकृत सदस्य, अन् 90 इच्छुकांनी घेतले अर्ज! मंत्री सावेंची डोकेदुखी पुन्हा वाढणार

Political News: महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठे रणकंदन माजले होते. बंडखोरी आणि उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली होती.
Atul Save  Devendra Fadnavis
Atul Save Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 57 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे स्वीकृत सदस्य पदासाठी मोठी गर्दी झाली आहे. यावेळी महापालिकेत 10 स्वीकृत सदस्य दिले जाणार आहेत. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपच्या वाट्याला पाच पद येणार आहेत. परंतु तब्बल 90 इच्छुकांनी स्वीकृत सदस्य पदासाठीचे अर्ज घेतल्याने मंत्री अतुल सावे यांची समजूत काढताना पुन्हा डोकेदुखी वाढणार आहे.

संख्याबळानुसार भाजपला पाच स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. यासाठी पक्षाकडे 180 हून अधिक इच्छुकांनी मागणी केली आहे. त्यातील 90 जणांनी महापालिकेतून उमेदवारी अर्जही घेतले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पक्ष नेमका कोणाला आदेश देतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठे रणकंदन माजले होते. बंडखोरी आणि उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून स्थानिक नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली होती.

Atul Save  Devendra Fadnavis
Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

कसेबसे हे बंड आणि नाराजी मोडून काढत भाजपने (BJP) सत्ता मिळवली. मात्र बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी नेत्यांनी अनेकांना स्वीकृत सदस्य पदाचे गाजर दाखवले होते. आता पाच जागांसाठी 180 जणांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्यामुळे नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. एवढ्या इच्छुकांमधून पाच जणांची निवड करणे नेत्यांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.

Atul Save  Devendra Fadnavis
PMC Nominated Corporators : पुण्यातील भाजपच्या स्वीकृत यादीवर माधुरी मिसाळ अन् हेमंत रासनेंची छाप; भीमराव तापकीर, योगेश टिळेकरांची ताकद कमी पडली?

एमआयएमची नावे जाहीर

भाजपमध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी प्रचंड स्पर्धा आहे. तर दुसरीकडे 33 नगरसेवकांसह महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद आली आहेत. यासाठी आज एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवरून मोहंमद असरार, शेख अहमद आणि कुणाल खरात या तिघांच्या नावाला हिरवा कंदील दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे.

Atul Save  Devendra Fadnavis
PMC Nominated Corporators : पुण्यातील भाजपच्या स्वीकृत यादीवर माधुरी मिसाळ अन् हेमंत रासनेंची छाप; भीमराव तापकीर, योगेश टिळेकरांची ताकद कमी पडली?

विशेष म्हणजे आतापर्यंत महानगरपालिकेच्या उमेदवारीपासून तर सर्व निर्णयांची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaj Jaleel) हे आपल्या फेसबुक अकाउंटवरून जाहीर करत होते. महापालिका निवडणुकीत गेल्या वेळच्या तब्बल 22 नगरसेवकांची उमेदवारी कापल्याने इम्तियाज जलील हे पक्षातीलच काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या निशाणावर होते. यातून निवडणूक प्रचार दरम्यान त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे प्रकारही घडले.

Atul Save  Devendra Fadnavis
Pune Congress News: जागा एक इच्छुक अनेक! मुंबई ते दिल्लीपर्यंत नेत्यांचे फोन अन् सेटिंग

स्वीकृत सदस्य पदासाठीही पक्षांमध्ये मोठी स्पर्धा असल्याने इम्तियाज यांनी ठरवलेली तीन नावे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे पाठवून त्यांच्या करवीच ती जाहीर केली गेली. त्यामुळे स्वीकृत सदस्य पदासाठी पक्षातील इतर जे इच्छुक होते त्यांना आता आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी थेट हैदराबाद गाठावे लागणार अशी चर्चा आहे.

Atul Save  Devendra Fadnavis
Mumbai property tax relief: सत्तेत येऊन 20 दिवस होताच महायुतीचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता कराबाबत ऐतिहासिक निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com