Mumbai property tax relief: सत्तेत येऊन 20 दिवस होताच महायुतीचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता कराबाबत ऐतिहासिक निर्णय

Mumbai civic election decision News : महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी एकमताने हा निर्णय झाला. त्यामुळे, मुंबईकरांना महापालिकेतील नव्या महायुतीकडून, नव्या महापौरांकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत मालमत्ता कराबाबतचा निर्णय चांगलाच गाजला होता. सत्तेवर येताच मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्षाने जाहीरनाम्यात निवडणुकीपूर्वीच दिले होते. मात्र, याबाबतचा निर्णय कधी घेतला जाणार याची उत्सुकता मुंबईकराना लागली होती. याबाबत सत्तेत येऊन 20 दिवस होताच महायुतीचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. मालमत्ता कराबाबत ऐतिहासिक निर्णय घेताना नव्या ठरावानुसार मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 500 चौरस फुटांवरून 700 चौरस फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी एकमताने हा निर्णय झाला. त्यामुळे, मुंबईकरांना महापालिकेतील नव्या महायुतीकडून, नव्या महापौरांकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे

महापालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी, जाहीरनाम्यात शिवसेना-मनसे (MNS) युतीकडूनही मालमत्ता करात 700 चौरस फुटापर्यंत सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना 500 चौरस फूटापर्यंतच्या घरासाठी कुठलाही कर द्यावा लागत नव्हता. मात्र, आता हीच मर्यादा 700 स्क्वेअर फूटापर्यंत वाढवण्यास महापालिकेच्या सभागृहात मंजुरी दिली आहे. या नवीन मालमत्ताकर सवलतीमुळे पालिकेला सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार आहे.

Mumbai Municipal Corporation
Shivsena UBT vs BJP : दोन मुलींच्या जन्मात केवळ 15 दिवसांचं अंतर! सोमय्यांनी लावून धरलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणात भाजप नगरसेवकच अडकणार

“मुंबईतील झोपडपट्टी व चाळींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबियांना खासगी विकासकामार्फत झोपडप‌ट्टी व चाळींचा पुनर्विकास व समूह पुनर्विकास ह्या योजनेंतर्गत सदनिका मोफत मिळतात. मात्र, मध्यमवर्गीय कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांना 500 चौ. फुटांच्या सदनिकांचे मालमत्ता कर भरणे देखील परयडत नाही. शिवाय, त्यांना देखभाल व दुरुस्तीचा सार्च देखील गृहनिर्माण संस्थेला भरावा लागतो. सदनिकेचा मालमत्ता कर व देखभालीचा वाढीव खर्चाचा भार सहन होत नसल्याने, मध्यमवर्गीयांना त्यांच्या सदनिका विकून मुंबई बाहेर स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसतो.

Mumbai Municipal Corporation
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

मूळ मुंबईकर मुंबईतच राहावा आणि त्यांच्यावर मुंबई सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून, मालमत्ता कर माफी असलेल्या 500 चौरस फुटांची मर्यादा वाढविणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिति लक्षात घेता, महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की, बृहन्मुंबई क्षेत्रातील 700 चौ. फुटापर्यंत निवासी सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा, असे या ठरावात म्हटले आहे. उपरोक्त परिच्छेद 1 मध्ये व्यक्त केलेल्या मताच्या अनुषंगाने राज्य शासनाकडे यथोचित निवेदन सादर करण्याची महापौरांना विनंती करण्यात यावी, असेही या ठरावात म्हटले आहे.

Mumbai Municipal Corporation
Pune Congress : स्वीकृत नगरसेवकाबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय; सतेज पाटलांची गेम चेंजर भूमिका; पुण्यातील 'त्या' उमेदवारांची धडधड वाढली

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी सभागृहात ही सूचना केली होती. आता हा प्रस्ताव पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर तो विधी व कायदे विभागाकडे जाईल. सर्व कायदेशीर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केला जाईल.

आयुक्तांची सही झाल्यानंतर अधिकृत परिपत्रक काढण्यात येईल आणि 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत लागू होईल. या निर्णयामुळे मुंबईतील हजारो कुटुंबांना थेट आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच या नवीन मालमत्ताकर सवलतीमुळे पालिकेला सुमारे 700 कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai Municipal Corporation
NCP Meeting : 'आम्ही ढवळाढवळ करणार नाही...', दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं; राष्ट्रवादीच्या बैठकीची इनसाईट स्टोरी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com