BJP Political News : महापालिकेतील स्वबळासाठी भाजपाचा उद्धव सेनेवर घाव!

BJP has devised a strategy against Uddhav Sena to gain self-reliance in the Sambhajinagar Municipal Corporation : उद्धव ठाकरे यांचा पक्ष शहरातून संपवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये एकप्रकारे स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते मात्र या सगळ्याकडे हतबलतेने पाहत आहेत.
Shivsena UBT-BJP News
Shivsena UBT-BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : राज्यात महायुतीची बहुमतासह सत्ता आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपा कमालीची आक्रमक झाली आहे. मंत्रीमंडळातील खाते वाटप, पालकमंत्र्यांची जबाबदारी देताना सर्वाधिक आमदार असल्याचा भाजपने पुरेपूर वापर करून घेतला. राज्यात 132 आमदार निवडून आणत मोठा पक्ष ठरल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेकडून युतीसाठी हात पुढे केला जात असताना स्थानिक नेत्यांनी तो झिडकारत शतप्रतिशत सत्ता आणि भाजपचा महापौर हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत वाटचाल सुरू केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरात गेली 25 वर्ष भाजप त्यांच्यासोबत महापालिकेच्या सत्तेत होती. भाजपचे अनेक महापौर याआधी होऊन गेले, पण ते अडीच वर्षासाठी. ठाकरेंची शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यादांच होणाऱ्या महापालिकेत आता भाजपला पुर्ण पाच वर्षासाठी महापौर बसवायचा आहे. त्यासाठी भाजपने स्वबळाचा नारा देत उद्धवसेनेवर घाव घातला आहे.

शिवसेना शिंदे गटात आऊटगोईंग सुरू असताना मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी आपल्या पुर्व मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांना आपल्याकडे खेचत पक्षात प्रवेश दिला. शिवसेना शिंदे गट आपल्यापेक्षा वरचढ होत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठांच्या सुचनेनूसार मंत्री अतुल सावे यांनी आपल्या मतदारंसघातील उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले.

Shivsena UBT-BJP News
Uddhav Thackeray : स्वबळाचा नारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा यू टर्न? महाविकास आघाडीची आज बैठक

शहरप्रमुखासह 35 पदाधिकाऱ्यांचा मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश करून घेण्यात आला. उद्धवसेनेसाठी हा मोठा धक्का असणार आहे. या शिवाय दहा ते बारा माजी नगरसेवक एक-दोन दिवसात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यावरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष शहरातून संपवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये एकप्रकारे स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते मात्र या सगळ्याकडे हतबलतेने पाहत आहेत.

Shivsena UBT-BJP News
BJP Election Strategy : पालिका निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय; निष्क्रिय नगरसेवकांना डच्चू, रिपोर्ट कार्ड पाहूनच उमेदवारी

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश सोहळा संपन्न झाल्याचे मंत्री अतुल सावे यांनी म्हटले आहे.

Shivsena UBT-BJP News
Ambadas Danve News : मला अन् खैरेसाहेबांना बदनाम करणारे तुम्हीच! अंबादास दानवे शिवसैनिकांवरच बरसले..

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उप जिल्हाप्रमुख शिवा लुगांरे, माजी नगरसेवक प्रसाद अत्तरदे, राजु खरे, विभाग प्रमुख सुगाम देहाडे, विभाग प्रमुख नागनाथ स्वामी, शाखा प्रमुख रोहिदास पवार, उपविभाग प्रमुख प्रकाश हांडे, उपशाखा प्रमुख शिवशंकर स्वामी, गटप्रमुख मनोहर विखणकर, अजिंक्य देसाई, पंतू जाधव, अनंत वराडे, वसंत देशमुख, सुभाष नेमाने, रमेश गल्हाटे.

Shivsena UBT-BJP News
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : विधानसभेला जागा वाढताच भाजपकडून स्वबळाचा नारा!

तसेच गौतम भारस्कर, विठ्ठल सोनावणे, तुकाराम घोडजकर, रवी बनकर, युवासेना उप शहरप्रमुख रोहित स्वामी, उप शाखाप्रमुख राहुल पाटील, उपशाखा प्रमुख योगेश चौधरी, गट प्रमुख बाबू स्वामी, आकाश बिडवे, निखिल पडूळ, चैतन्य जोशी, ऋषिकेश भालेराव, तुषार पाथ्रीकर, मयुरेश जाधव, रोहन स्वामी, सूर्यकांत मानकापे, आयुष शेडगे, सर्वज्ञ पोफळे यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com