BJP News : राणा पाटलांच्या मुलाला भावी खासदार म्हणणं भोवलं : भाजप पदाधिकाऱ्याला तडकाफडकी हटवलं; पण नव्या अध्यक्षांकडून त्यांचाच उदो उदो

Malhar Patil, BJP Yuva Morcha, Omprakash Rajenimbalkar, Shiv Sena : धाराशीव भाजपात अंतर्गत धुसफूस; राहुल काकडे यांची उचलबांगडी झाल्यानंतरही सोशल मीडियावर मल्हार पाटील यांचा समर्थकांकडून जोरदार उदो उदो.
Malhar Patil, Omprakash Rajenimbalkar
Malhar Patil, Omprakash RajenimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Politics : संसदेच्या दोन्ही सभागृहात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी लागणाऱ्या बहुमतासाठी दिल्लीतील भाजपा नेते जुळवाजुळव करत होते. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे गळाला लागत असतानाच धाराशीवमध्ये भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पूत्र मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी काही बॅनर लावले होते. यामध्ये भावी खासदार असा त्यांचा उल्लेख करण्यात आला होता.

ऑपरेशन टायगर यशस्वी झाले अन् ओमराजे शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर आता तेव्हा लावलेल्या त्या बॅनरवरून ते लावणाऱ्या भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल काकडे यांची पक्षातून उचलबांगडी करण्यात आली आहे. मल्हार पाटील यांना भावी खासदार संबोधने काकडे यांच्या अंगलट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

स्वतः काकडे यांनी मात्र आपण स्वतः वैयक्तिक कारणामुळे पद सोडल्याचे म्हटले आहे. पण नव्या अध्यक्षानेही मल्हार पाटील यांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट टाकत आपणही त्यांचे समर्थक असल्याचे दाखवून दिले आहे. धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षात गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे.

Malhar Patil, Omprakash Rajenimbalkar
School Education news : अनुदानित खाजगी शाळांसाठी खूशखबर; शिक्षकेत्तर पदभरतीवरील स्थगिती उठविली, मान्यतेचा जीआर काढला...

खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला म्हणजे ते महायुतीचा भाग झाल्यापासून ही धुसफूस अधिकच वाढली आहे. दरम्यान, राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भावी खासदार अशी बॅनरबाजी युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल काकडे यांनी केली होती. ती राज्य पातळीवरील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना खटकली. त्यानंतर काही दिवसातच हे बॅनर लावणाऱ्या युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल काकडे यांना या पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले.

Malhar Patil, Omprakash Rajenimbalkar
Amit Shah vs Rahul Gandhi : अमित शाह पहिल्यांदाच मीडियासमोर, विरोधकांना दिलं आव्हान; राहुल गांधींकडूनगी काही मिनिटांतच समोर येत प्रत्युत्तर...

राणा पाटील पिता-पुत्रांसाठीही हा धक्का मानला जातो. पण ज्या गणेश इंगळगी यांच्याकडे आता नव्याने युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांनीही सोशल मिडियावरून 'आरंभ नव्या युगाचा, कधीही न संपणाऱ्या मल्हार पर्वाचा' अशी पोस्ट टाकून मल्हार पाटील यांचा उदो उदो सुरू केला आहे. यावरून धाराशीव जिल्ह्यातील तरूण मल्हार पाटील यांच्यासोबतच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अचानक त्यांचे समर्थक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाल्याने वेगळ्याच चर्चा झडू लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com