Ashok Chavan News : आंबेडकरांना सोबत घेत अशोक चव्हाणांनी मारली बाजी..! 'एमआयएम'चे काय ?

Nanded Loksabha : एमआयएम नांदेडमध्ये स्वबळावर उमेदवार देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Prakash Ambedkar, Ashok Chavan, Imtiaz Jaleel
Prakash Ambedkar, Ashok Chavan, Imtiaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political : लोकसभा निवडणुकीत नांदेडमधील विजयात वंचितचा अडसर अखेर अशोक चव्हाण यांनी दूर केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्षाला महाविकास आघाडीचा घटकपक्ष बनवण्यात अशोक चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली. यासोबतच त्यांनी नांदेडमध्ये निवडणुकी आधीच मोठा डाव जिंकल्याची चर्चा होत आहे.

दुसरीकडे गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या एमआयएमला सोबत घेत वंचितने अशोक चव्हाण यांचा 'गेम' केला होता, ती एमआयएम मात्र सध्या एकाकी पडली आहे. नांदेड जिल्ह्यात मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे एमआयएम नांदेडमध्ये स्वबळावर उमेदवार देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Prakash Ambedkar, Ashok Chavan, Imtiaz Jaleel
Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांनी वाढवली जयंत पाटलांची धडधड; थेट 'होमग्राऊंड'वरच सुरु केलं पक्षाचं कार्यालय

एमआयएमचे राज्यातील एकमेव खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नुकताच परभणी जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यांना तिथे मिळालेला प्रतिसाद धडकी भरवणारा होता. त्यामुळे वंचितने अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसशी जुळवून घेतले असले तरी एमआयएमकडून दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम नांदेडमध्ये होऊ शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवण्याइतपत 'व्होट बँक' या पक्षाची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या आघाडीने विजयाचे गणित बिघडवले होते. तर छत्रपती संभाजीनगर येथून एमआयएमचे इम्तियाज जलील हे निवडून आले होते.

पण वंचितसोबतची ही आघाडी फार काळ टिकली नाही. सात महिन्यानी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाने स्वतंत्र चुली मांडल्या होत्या. तेलंगणा राज्याच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम व‌ बीआरएसची आघाडी होती. या आघाडीला बहुमत मिळाले नाही, त्यामुळे बीआरएसच्या गोटातही आगामी लोकसभा महाराष्ट्रात लढवण्या संदर्भात कमालीची शांतता आहे.

एमआयएमची राज्यातील काही भागात चांगली ताकद आहे. पण विजयापर्यंत जाण्यासाठी त्यांना इतर पक्षाच्या टेकूची गरज भासणार आहे. पण सध्या तरी एमआयएम पासून राज्यातील सगळेच पक्ष अंतर राखून आहेत. या पक्षाने नांदेड मार्गे राज्यातील राजकारणात शिरकाव केला. आपल्या आक्रमक भाषणाने ओवीसी बंधू आणि त्यांच्या एमआयएम पक्षाने मुस्लिम बहुल भागात चांगला जम बसवला.

मुस्लीम मतदार एमआयएमकडे वळल्यामुळे याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मतदार कोणाला साथ देतो याला विशेष महत्त्व आहे. एमआयएमचा सक्षम उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अडचणीचे ठरू शकते.

(Edited by Amol Sutar)

Prakash Ambedkar, Ashok Chavan, Imtiaz Jaleel
Maharashtra Congress : मोठी बातमी! काँग्रेस फुटीच्या मार्गावर; महिन्याभरातच राज्यात मोठा भूकंप ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com