Sharad Mohol Case : शरद मोहोळच्या हत्येमागे अतिरेक्यांचे कट-कारस्थान ? हिंदुत्ववादी संघटनांना संशय

Pune Crime News : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी...
Sharad Mohol Case
Sharad Mohol Case Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळची 5 जानेवारीला सुतारदरा कोथरूड येथे हत्या करण्यात आली. यामागे अतिरेकी संघटनांचे हात असण्याचा संशय आता हिंदुत्ववादी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मोहोळच्या हत्येच्या तपासावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात बोलताना मिलिंद एकबोटे म्हणाले, "शरद मोहोळच्या हत्येचे पडसाद विचित्र प्रकारे अनेक माध्यमांद्वारे समाजात निर्माण करण्यात आले. शरद मोहोळची असलेली पार्श्वभूमी कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून रंगविण्यात आली. तसेच समाजाप्रती असणारे सत्कार्य पडद्यामागेच ठेवण्यात आले. त्यामुळे पुण्यातील सर्व नामांकित हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे आणि भीतीचे वातावरण आहे," असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Mohol Case
Sharad Mohol Murder Case : मोहोळ खून प्रकरणातील मास्टरमाइंडला अटक; रामदास मारणेसह तिघे जेरबंद

"मोहोळचे असणारे स्वधर्माप्रतीचे कार्य म्हणजेच जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील कातिल सिद्दीकीला मारल्यामुळे अतिरेक्यांचा आणि धर्मांधांचा रोष शरद मोहोळवर होता. त्यामुळे आर्थिक पाठबळ पुरवून मोहोळची हत्या केल्याचा आमचा संशय आहे. तसेच पकडलेल्या हल्लेखोरांना व हत्येच्या कटातील सूत्रधाराच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याचाही संशय दृढ होत आहे," असं मिलिंद एकबोटे म्हणाले.

"हत्येमध्ये वापरलेली विदेशी बनावटीची शस्त्रे हे यात खूप मोठ्या असामी असल्याचे सुचवून जातात. त्यामुळे गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांच्या तपासण्या पुन्हा व्हाव्यात आणि मारेकऱ्यांकडे आलेला पैसा, गाड्या, तसेच इतर चैनीच्या वस्तू याबद्दल सखोल तपासणी व्हावी," अशी मागणी असल्याचे एकबोटे म्हणाले.

Sharad Mohol Case
Sharad Mohol Case Update : ...तर शरद मोहोळ वाचला असता; पोलिसांची एक चूक अन् कोथरूडमध्ये गेम

"शरद मोहोळची झालेली हत्या ही राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात खळबळजनक घटना असून, या घटनेचा संपूर्ण तपास हा केंद्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला सोपवण्यात यावा, याची आम्ही मागणी करतो. शरद मोहोळचे राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम हे त्याच्या वारकरी संप्रदायातील कार्यात, अवयवदानात, गोशाळा उभारणीत, तसेच मुलींसाठी चालू केलेल्या स्व-संरक्षण वर्ग यांसारख्या अनेक माध्यमांतून दिसून येते," असे एकबोटे म्हणाले.

हिंदुत्ववादी संघटना 28 जानेवारीला मोर्चा काढणार

"मोहोळचे बॅनर काढण्यासाठी प्रशासन पुढे सरसावलेले असून, याचा आम्ही निषेध करतो. या केसमध्ये केंद्रातून हस्तक्षेप होऊन दोर्षीवर त्वरित कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना 28 जानेवारीला पुण्यात एक जनमोर्चा काढणार आहेत, त्याची सुरुवात किनारा हॉटेलपासून होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथररूड येथे समाप्ती होईल.

तसेच शरद मोहोळचे मारेकरी आणि हल्ल्यामागील सूत्रधार लवकरात लवकर पकडले जातील. या आंदोलनात समस्त हिंदू आघाडी, विश्व हिंदू परिषद, पतित पावन संघटना, समस्त हिंदूबांधव सामाजिक संस्था, पुण्येश्वर कृती समिती, विश्व हिंदू मराठा महासंघ, अखिल हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Sharad Mohol Case
Sharad Mohol Case Update : गुंड मोहोळ खून प्रकरणातील आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या 13 वर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com