Chhatrapati Sambhaji Nagar Riots Who is Responsible Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरातील किराडपुरा भागात दोन गटांत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट दंगलीत झाले होते. श्रीराम मंदिरासमोरच आधी दोन गट भिडले होते. या दंगलीवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करीत आहेत.
ही दंगल पूर्वनियोजित होती, असे काहीचे मत आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. दानवे हे पत्रकारांशी बोलत होते. "दंगल पूर्वनियोजित होती असे म्हणणाऱ्यांनी काय केले," असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
दानवे म्हणाले, "संभाजीनगरची दंगल ही पूर्वनियोजित होती, हे सत्य आहे. दंगल होण्याअगोदर एक महिन्यापूर्वीपासून मी पोलीस आयुक्तांना वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं होतं. दंगल होण्याच्या चार दिवस अगोदर देखील बोललो होतो, दंगल होण्याच्या एक दिवस अगोदर देखील पोलीस आयुक्तांना बोललो होतो. रोज त्या भागात काही ना काही होत होतं,"
"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही दंगल पूर्वनियोजित होति असं माहित होतं, तर गृहखातं काय करत होतं आणि पोलीस आयुक्त का करीत होती होते? पोलीस आयुक्तांनी ही दंगल मोडून का काढली नाही ? पोलीस आयुक्त उशिरा का पोहोचले ? पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे आलेले फोन का उचलले नाहीत ? असे विविध प्रश्न अंबादास दानवेंनी उपस्थित केले आहेत.
"दंगल आटोक्यात आणण्यासाठी दोन ते तीन तास घेतले व महिला पोलिसांना फायरिंग करावी लागली, पुरुष पोलीस अधिकारी मात्र आयुक्तांच्या सोबत होते. त्यामुळे संभाजीनगरचे पोलीस देखील या दंगलीला जबाबदार आहेत.पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल ठरलेली आहे. बऱ्याच दिवसापासून दंगलीचे प्रयत्न सुरू होते, दंगल पूर्वनियोजित होती तर हे समोर यायला पाहिजे," असे दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.