Sambhajinagar ZP Result : पैशांच्या तिजोऱ्या अन् मंत्र्यांच्या फौजेला निष्ठेचे उत्तर! झेडपीत 9 जागा जिंकल्यानंतर अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा!

ZP Election Result Maharashtra 2026 : झेडपी निवडणुकीत नऊ जागा जिंकत अंबादास दानवेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद दाखवली आणि सत्ताधाऱ्यांना ठाम विरोधाचा इशारा दिला.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve addressing party workers after winning nine Zilla Parishad seats, signaling a strong opposition stance against the ruling alliance.
Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve addressing party workers after winning nine Zilla Parishad seats, signaling a strong opposition stance against the ruling alliance.Sarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve Statement Today: महानगर पालिका निवडणुकीत शंभर जागा लढवून केवळ सहा नगरसेवक निवडून आल्यानंतर टीकेचे धनी ठरलेले शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषदेत यश मिळवले. 36 उमेदवार दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 सदस्य निवडून आले आहेत. सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या यशाच्या तुलनेत हे यश निश्चितच मोठे मानले जात आहे.

अंबादास दानवे या विजयावर समाधानी आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पैशांच्या तिजोऱ्या अन् मंत्र्यांच्या फौजेला निष्ठेने उत्तर दिलयं, असा टोला त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून भाजप-शिवसेनेला लगावला आहे. या संदर्भात दानवे यांनी एक पोस्ट केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या पैशांच्या तिजोऱ्या आणि मंत्र्यांच्या फौजेला निष्ठेने उत्तर दिलंय!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजयी झालेले 9 वाघ विरोधकांना घाम फोडण्यासाठी पुरेसे आहेत. बहुमत तुमचं असलं तरी मनमानी कारभार करण्याचा रस्ता आमचे शिलेदार अडवतील, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, तुमची वाट सोपी नसेल, असा सूचक इशारा अंबादास दानवे यांनी यातून दिला आहे.

महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ सहा नगरसेवक निवडून आणता आले होते. या निवडणुकीची सगळी सुत्रं ही अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली होती.

जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांची नाराजी, पक्षांतर्गत कुरबुरी याचा फटका महापालिकेला बसला. त्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी अंबादास दानवे यांच्यावरच सोपवली होती.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve addressing party workers after winning nine Zilla Parishad seats, signaling a strong opposition stance against the ruling alliance.
Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांची झेडपीत सरशी, पण पंचायत समितीत भाजपनं दिला पराभवाचा धक्का

चंद्रकात खैरे यांच्यावर धाराशीव, लातूर जिल्ह्याची जबाबदारी असल्याने ते छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुक प्रचार, यंत्रणा आणि रणनीती पासून दूर होते. अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करत उमेदवार दिले.

काँग्रेसला सोबत घेण्याचा शिवसेनेला किती फायदा झाला याचे आत्मचिंतन करावे लागेल. पण अंबादास दानवे यांनी 9 सदस्य निवडून आणत पक्षाच्या कामगिरीची सत्ताधारी आणि आघाडीतील मित्र पक्षांनाही दखल घ्यायाला भाग पाडले.

Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve addressing party workers after winning nine Zilla Parishad seats, signaling a strong opposition stance against the ruling alliance.
Parbhani ZP Result : परभणीत भाजपाची मुसंडी; 24 जागांसह ठरला मोठा पक्ष, सत्तेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीला सोबत घेणार?

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांची संख्या एकत्र केली तर हा आकडा 31 वर जातो. म्हणजेच भाजपपेक्षाही अधिक, याचाच अर्थ ग्रामीण भागात आजही शिवसेनेची ताकद कायम आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 9 सदस्य निवडून आले असले तरी ते विरोधकांची भूमिका ठामपणे बजावतील असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com