Chhatrapati Sambhajinagar Loksabha : घटिका समीप, मतदार सज्ज; उमेदवारांची धाकधूक...

Loksabha Election : महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील या प्रमुख उमेदवारांसह वंचितचे अफसर खान, अपक्ष हर्षवर्धन जाधव, जीवन राजपूत यांच्यासह 37 उमेदवार रिंगणात आहेत
sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleel
sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleelsarkarnama

Politial News : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात गेली दोन आठवडे जनतेने सत्ताधारी, विरोधक आणि अपक्ष उमेदवारांचे म्हणणे, जाहीरनामे, आश्वासने ऐकली. गद्दार, दारू, खोके, नकली-असली, हिंदुत्व यासह असंख्य मुद्यावर एकमेकांवर चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप करून झाल्यानंतर आता उद्या सोमवारी (ता.13) प्रत्यक्षात मतदान होत आहे. मतदानाची घटिका समीप आली आहे. मतदारराजा सज्ज झाला आहे अन् उमेदवारांची धाकुधूक वाढली आहे. अशीच परिस्थिती मतदानाच्या पुर्वसंध्येला जिल्ह्यात पहायला मिळाली. 21 लाख मतदार उद्या सोमवारी आपल्या मतदानाचा हक्क बजावून संसदेत पाठवण्यासाठीचा प्रतिनिधी निवडणार आहे.

sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleel
Raj thackeray : आनंद अजूनही जागा आहे! आनंदमठा बाहेर झळकला दिघे-ठाकरेंचे बॅनर

महायुतीचे संदीपान भुमरे Sandipan Bhumre , महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील imtiyaz jaleel या प्रमुख उमेदवारांसह वंचितचे अफसर खान, अपक्ष हर्षवर्धन जाधव, जीवन राजपूत यांच्यासह 37 उमेदवार रिंगणात आहेत. या सगळ्यांच्या नशिबाचा फैसला उद्या सोमवारी ईव्हीएमसमोरील बटन दाबून मतदार करणार आहेत. तत्पुर्वी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी उद्या अधिकाधिक मतदान कसे करू घेता येईल? यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मराठवाड्यातील आतापर्यंत झालेल्या पाच लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का फारसा समाधानकारक नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटलेले मतदान सगळ्या राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मराठवाड्यातील शेवटच्या टप्प्यातील संभाजीनगरसह जालना, बीड या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यावर सगळ्यांचा भर असणार आहे. महायुतीकडे भाजपची प्रबळ यंत्रणा आहे, तर महाविकास आघाडीकडे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस या पक्षांची बूथ स्तरावरील बांधणी मजबुत असल्याचे बोलले जाते.

त्यामुळे या पक्षांना मतदारांना बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आतापर्यंतच्या मतदानात तीव्र उन्हामुळे टक्क घसरल्याचे कारण पुढे आले होते. त्यामुळे सकाळी सात ते दुपारी अकरापर्यंत निम्मे मतदान कसे पार पडेल? याचा प्रयत्न राजकीय पक्षांची निवडणूक यंत्रणा सांभाळणाऱ्या टीमचा असणार आहे. त्यानंतर दुपारी चार ते सहा या दोन तासात उर्वरित मतदान करून घेण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

याशिवाय जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेला मतदान सुरळीत, शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मतदानसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असली तरी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेऊन ते करवून घेणे जिकरीचे काम असणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघात 63 टक्के मतदानाची नोंद झाली होती. हा आकडा यावेळी सत्तर टक्क्याचे पुढे जातो का? यावर प्रमुख उमदेवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम अशा तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याचा अंदाज झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून लावला जाणार आहे.

(Edited By Roshan More)

sandipan bhumare chandrakant khaire Imtiyaz Jaleel
Kejriwal Vs Modi : अरविंद केजरीवाल यांचे 'या' 10 गॅरंटीतून थेट PM मोदींना चॅलेंज!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com