Raj thackeray : आनंद अजूनही जागा आहे! आनंदमठा बाहेर झळकला दिघे-ठाकरेंचे बॅनर

Anandmath : राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पहिली सभा त्यांनी कोकणात नारायण राणे यांच्यासाठी घेतली. तर, दुसरी सभा पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी घेतली.
Raj thackeray banner
Raj thackeray bannersarkarnama

Loksabha Election : मनसे प्रमुख राज ठाकरे हे महायुतीचे श्रीकांत शिंदे आणि नरेंद्र म्हस्के यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत. या सभांच्या निमित्ताने राज ठाकरे ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमास आज मनसे (रविवार) अध्यक्ष राज ठाकरे भेट दिली. दिघेंच्या आनंदमठाबाहेर शिवसैनिकांनी एक बॅनर लावला होता. या बॅनरवर आनंदाची जागा आहे आनंद अजूनही जागा आहे, असा मजकूर लिहत खालच्या बाजूला आनंद दिघे व राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो लावण्यात आला आहे.

Raj thackeray banner
Shivsena Vs BJP: चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर जहरी टीका, म्हणाल्या, तुमच्यासारख्या कंपाऊंडरची...

राज ठाकरे Raj thackeray महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पहिली सभा त्यांनी कोकणात नारायण राणे यांच्यासाठी घेतली. तर, दुसरी सभा पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी घेतली. या सभेतून राज यांनी महाविकास आघाडीवर MVA जोरदार टीका करताना थेट हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे, असा आपण फतवा काढत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज ठाकरे खारेगाव मध्ये कल्याण व ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी सभा घेणार आहेत. त्या सभेत ते काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

60 ते 70 हजार नागरिक येणार...

राज ठाकरे यांच्या सभेच्या शिवसेनेकडून (शिंदे गट) जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग हा भागात आहेत. मनसेची ताकद देखील कल्याण ग्रामीण भागात असून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीणमधून निवडून आले आहेत. राज ठाकरे यांच्यासभेसाठी 60 ते 70 हजार नागरिक येतील, अशी शक्यता श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Raj thackeray banner
Kejriwal Vs Modi : अरविंद केजरीवाल यांचे 'या' 10 गॅरंटीतून थेट PM मोदींना चॅलेंज!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com