Chhatrapati Sambhajinagar Constituency : ...म्हणून आता छत्रपती संभाजीनगरमधून उच्चशिक्षित खासदार निवडा!

Loksabha Election 2024 : जिल्ह्यातील नवतरुण, उच्चशिक्षित हे इतर जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत, याचे कारण म्हणजे जिल्ह्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला विकास.
Chhatrapati Sambhajinagar Constituency
Chhatrapati Sambhajinagar ConstituencySarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : आतापर्यंत या मतदारसंघात झालेल्या जातीपातीच्या राजकारणात जिल्ह्याचा विकास मागे राहिला. ऐतिहासिक वारसा, राज्याची पर्यटन राजधानी, औद्योगिक विकासाला चालना देणारे उद्योग असूनही केवळ उच्चशिक्षित उमेदवार निवडून न दिल्याने संभाजीनगरचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे संसदेत उच्चशिक्षित उमेदवार निवडून पाठवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार डाॅ. जीवन राजपूत यांनी केले.

जिल्ह्याच्या राजकारणात जीवन राजपूत यांचे नाव एखाद्या वादळासारखे समोर आले. बदल घडवण्यासाठी उच्चशिक्षित उमेदवार, असा दावा करत त्यांनी लोकसभा (Loksabha Election) लढवण्याचा निर्णय घेतला. अर्थात प्रस्थापित पक्षांकडून फारशा अपेक्षा नसल्याने राजपूत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते रिंगणात उतरले आहेत. एक उमेदवार म्हणून आपली भूमिका मांडताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासावर काही प्रश्न उपस्थितीत केले.

Chhatrapati Sambhajinagar Constituency
Bhushan Patil : मुंबई उत्तर मतदारसंघातून काँग्रेसची भूषण पाटलांना उमेदवारी; पीयूष गोयलांशी लढत!

जिल्ह्यातील नवतरुण, उच्चशिक्षित हे इतर जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत, याचे कारण म्हणजे जिल्ह्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला विकास. केवळ शिक्षण नसलेलेल्या पुढाऱ्यांच्या हातात सत्ता आणि पद दिल्यामुळे जिल्ह्याचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. तो करता यावा यासाठी मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे. नागरिकांनी आता भावनिक किंवा जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता उच्चशिक्षित उमेदवारांना निवडून द्यावे.

छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) निवडून आल्यावर खासदार निधीतून मिळणारा पैसा हा सर्व जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांवर खर्च झाला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे. माझा डॉक्टरी पेशा असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून खेड्यापाड्यात मी फिरलो आहे. या माध्यमातून संपर्क आणि लोकांच्या समस्या मला जवळून अनुभवता आल्या. जिल्ह्यात एकही उच्चशिक्षित शिक्षित उमेदवार नाही, या निमित्ताने प्रस्थापित उमेदवारांना पराभूत करण्याची संधी चालून आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशातील राजकारणामध्ये सहा टक्के ही प्रस्थापित नेत्यांची मुले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एक नवा पर्याय म्हणून, लोकांनी नव्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. या निवडणुकीत काही शिक्षित उमेदवार रिंगणात आहेत, परंतु त्या उमेदवाराला निवडून दिल्यास हैदराबादची गुलामी करावी लागेल, असा टोला राजपूत यांनी एमआयएमचे उमेदवारी इम्तियाज जलील यांना नाव न घेता लगावला. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपकडून (BJP) तिकीट मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्नशील होतात? यावर प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठीच मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे राजपूत यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Sambhajinagar Constituency
Sandipan Bhumre: मंत्रीपदातून शेतकऱ्यांची कामे केली, आता दिल्लीत जाण्याची संधी द्या; भुमरेंचं आवाहन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com