Chh. Sambhajinagar ZP: भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आज जिल्हा परिषदेतील प्रशासकांच्या कार्यकाळात झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुका लांबल्यामुळे CEO विकास मीना यांच्या कार्यकाळात साडेचार कोटींची खोटी बीलं उचलण्यात आल्याचे पुरावे आमदार बंब यांनी दिले आहेत. या प्रकरणात आता झेडपीतील कार्यकारी अभियंता, कॅफो व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध थेट पोलीसात धाव घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्यासह आमदार प्रशांत बंब यांनी आज झेडपीतील विकास कामांचा आढावा घेतला. दोन-तीन वर्षात प्रशासक राज असताना प्रशांत बंब यांच्याच मतदारसंघातील दोन सर्कलमध्ये इमारत, रस्ते झालेले नाहीत. याचे कागदोपत्री पुरावे, व्हिडिओ आणि चौकशीसाठी तब्बल बारा पत्रं दिली तरी दखल घेतली गेली नाही. न झालेल्या कामाची बीलं उचलंणे म्हणजे निर्लज्यपणाचे लक्षण असल्याचा संताप प्रशांत बंब यांनी व्यक्त केला.
''जलजीवन मिशनच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. अनेक ठिकाणी योजनेची काम झालेली नाहीत, इमारती, रस्ते नाहीत या संदर्भातचे पुरावे त्या काळचे सीईओ मीना यांच्याकडे आम्ही दिले होते. चौकशीसाठी वारंवार पत्रं दिली. त्यानंतर अपेक्षित होते की निकृष्ट दर्जाचे काम थांबवले गेले पाहिजे होते, पण ते न करता सीईओ, कार्यकारी अभियंता व इतर काही अधिकाऱ्यांनी संगनमताने साडेचार कोटींची बीलं उचलली आहेत. हा प्रकार एका योजनेत समोर आला आहे.''
''या शिवाय इतर योजनेत देखील अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला असल्याची दाट शक्यता आहे. त्याचेही पुरावे आणि कागदपत्रं आम्ही जमा करत आहोत,'' असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगीतले. ''तक्रारींची दखल तर घेतलीच नाही, पण न झालेल्या कामांची बीलं देण्यात आली. ही लाजीरवाणी बाब आहे. याशिवाय 30-54, विविध ब गटातील कामांच्या बाबतीत असे प्रकार घडलेले आहे. रस्ते न करता पैसे उचलल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत.'' असे म्हणत, या सगळ्या संबंधितांवर कारवाई करून त्यांच्याकडून वसूली करण्यात येणार असल्याचे बंब यांनी सांगीतले.
मुख्यालयी न राहणाऱ्यांची खैर नाही..
"जे ZP शिक्षक मुख्यालयी राहणार नाही त्यांच्यावर यापुढे निलंबन आणि त्यापुढे जाऊन बडतर्फीची कारवाई करायला भाग पाडणार असल्याचे प्रशांत बंब यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात नाही. नुसती टीईटी नाही तर शिक्षकांची आम्ही वेगळी परीक्षा घेणार आहे. शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने त्यांची गुणवत्ता ढासळली आहे. आता हे खपवून घेणार नाही. माझी सर्व शिक्षकांना हातजोडून विनंती आहे, की त्यांनी मुख्यालयी राहावे. अन्यथा यापुर्वी मुख्यालयी राहतो असे सांगून ज्यांनी बोगस पैसे घेतले आहेत, त्याचीही वसुली केली जाईल," असा इशाराही प्रशांत बंब यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.