Aimim Political News : एमआयएम-शिवसेना संघर्षाची ठिणगी पडली; अतिक्रमणावरून भडका उडणार

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : रमजानच्या महिन्यातच एमआयएम पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एमआयएमच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेत अतिक्रमणबाबत भूमिका जाणून घेतली.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation politics
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजप सत्तेत असून एमआयएम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे.

  2. शाहागंज भागात अतिक्रमण वादातून फळ विक्रेत्या महिला आणि गर्भवती महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

  3. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होऊन राजकीय वातावरण तापले आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आणि एमआयएम हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. महापौर, उपमहापौर, गट नेत्यांची निवड होऊन प्रत्यक्षात शहराच्या कारभाराला सुरूवात होत असतानाच सत्ताधारी शिवसेना आणि एमआयएममध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. शहरातील शहागंज भागात रस्त्यावर अतिक्रमण करून फळ विक्री करणाऱ्यांच्या एका टोळक्याने तीन दिवसापूर्वी एका फळ विक्रेत्या महिलेसह एका गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली होती. या शिवाय या गर्भवती महिलेच्या पतीला आठ ते दहा जणांनी लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या घटनेनंतर शहागंज भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

रस्त्यावर अतिक्रमण करून वर नागरिकांनाच मारहाण झाल्याने महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपा पक्षाने या भागातील अतिक्रमण काढण्याची मागणी आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे केली. त्यानूसार दोन दिवसापुर्वी दिवसभर शहागंज भागात रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू होते. याला विरोध झाला, पण पोलीस बंदोबस्त असल्याने तो मोडून काढण्यात आला. या कारवाईच्या विरोधात फळ विक्रेत्यांमध्ये संताप होता. तर ज्या एमआयएमच्या नगरसेवकांना आम्ही निवडून दिले, ते आता कुठे आहेत, असे म्हणत त्यांनी खडेबोल सुनावले.

या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काल दुपारी एमआयएमच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेत रमजानच्या महिन्यातच महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आल्याबद्दल काय भूमिका घ्यायची? यावर चर्चा झाली. बैठक झाल्यानंतर एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल साजेद समीर आणि काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन रमजानचा महिना झाल्यानंतर अतिक्रमण हटाव कारवाई केली जावी, अशी मागणी केली. यावर अतिक्रमण हटाव पथकाचे उपायुक्त वाहुळ यांना या भागात जाऊन रस्त्यावर मार्किंग करून फळ विक्रेत्यांना त्याच्या पुढे न येऊ देण्याच्या सूचना देऊन गाड्या लावू द्याव्यात, असे सांगितल्याचे समीर साजेद म्हणाले.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation politics
Aimim News : महापालिकेत बलाढ्य भाजपला नडण्यासाठी इम्तियाज जलिल यांचा 'चेला' मैदानात : एमआयएमचा विरोधी पक्ष नेता घाम फोडणार?

आयुक्तांची भेट घेतल्यानंतर समीर साजेद व एमआयएमचे नगरसेवक शहागंजमध्ये पोहचले. त्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला तिथून हुसकावून लावले. फळ विक्रेत्यांना पुन्हा गाड्या लावण्यास सांगीतल्याने वातावरण अधिकच चिघळले. अतिक्रमणाला पाठबळ देणाऱ्या किंवा कारवाईत अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे एमआयएमचे नगरसेवक अधिकच चिडले.

मुस्लिम फळ विक्रेत्यांवरच कारवाईचा आरोप..

शिवसेनेच्या नगरसेवकाच्या सांगण्यावरून महापालिकेने शहागंज भागात अतिक्रमणांवर कारवाई केली. नगरसेवक सांगत होता ती दुकाने तोडली जात होती, असा आरोप साजेद समीर यांनी केला. ज्या गर्भवती महिलेला व तिच्या पतीला मारहाण झाली, त्या आरोपींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, मारहाणीचे समर्थनक कदापी केले जाणार नाही. पण या आडून ऐन रमजानच्या महिन्यात विशिष्ट समाजाला लक्ष केले जाऊ नये, असेही समीर साजेद म्हणाले.

नियमात व्यवसाय करा..

शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी महापालिकेची कारवाई योग्य असल्याचे म्हणत समर्थन केले. रमजान महिना असला तरी फळ विक्रेत्यांनी नियमात राहूनच आपला व्यवसाय करावा. सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली गेलीच पाहिजे. फळ विक्रेत्यांकडून दादागिरी, लोकांना मारहाणीचे प्रकार शहागंजमध्ये नवे नाही, अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण करून वर दादागिरी करणाऱ्यांचे समर्थन कदापी करता येणार नाही.

कारवाईच्या आड येणाऱ्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे. काल अतिक्रमण हटाव पथकाला शिवीगाळ करून कोणी हुसकावून लावले, कारवाईला कोणी विरोध केला याचे व्हडिओ समोर आले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांवर निश्चित कारवाई केली जाऊ शकते, तशी मागणी आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत, असेही राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. एकूणच महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये या अतिक्रमण हटावच्या कारवाईवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. याचा भडका भविष्यात उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation politics
Akola Mayor : भाजपच्या विजयानंतर अकोला महापालिकेत 'काँग्रेस-AIMIM'चा राडा; संतप्त नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावले, बांगड्यांची फेकाफेक

FAQs :

1. घटना नेमकी कुठे घडली?
शहरातील शाहागंज भागात ही मारहाणीची घटना घडली.

2. कोणावर हल्ला करण्यात आला?
एका फळ विक्रेत्या महिला, गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर हल्ला झाला.

3. या घटनेमुळे काय परिणाम झाला?
महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये राजकीय संघर्ष वाढला.

4. अतिक्रमणाचा मुद्दा काय आहे?
रस्त्यावर फळ विक्रीसाठी अतिक्रमण केल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.

5. पुढील कारवाई काय होऊ शकते?
पोलीस तपास, दोषींवर कारवाई आणि राजकीय प्रतिक्रिया पुढे येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com