

Shivsena News : शिवसेना-भाजप युतीसाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकीकडे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पाठ फिरवली. शिवसेनेचे उमेदवार हमखास निवडून येतील अशा 7 ते 8 जागा या आम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. अशावेळी मी जिल्हाप्रमुख म्हणून स्वतः निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी एखाद्या सक्षम कार्यकर्त्याला तिथून संधी देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.
शिवसेना प्रचार कार्यालयात सोमवारी दुपारपासूनच नाराजीनाट्याला सुरूवात झाली. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शारदा घुले यांना ऐनवेळी उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनी समर्थकांसह कार्यालयातच ठिय्या दिला. त्यांच्यासोबतच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घुले यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, असे म्हणत घोषणाबाजी सुरू केली. विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जैस्वालही तिथे उपस्थित होते.
हा सगळा प्रकार पाहता राजेंद्र जंजाळ यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसेल तर मग काय उपयोग? ज्या जागा आम्ही निश्चित जिंकू शकतो अशा जागाच आता आम्हाला मिळणार नाहीयेत, त्या सोडण्यात आल्याचे समजते. अशावेळी एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्यांला संधी द्यावी, यासाठी मी थांबण्याचा निर्णय घेत असल्याचे जंजाळ यांनी सांगितले.
तर निष्ठावंत कार्यकर्ते, ज्यांनी माझ्या विधानसभा निवडणुकीत घरोघरी जाऊन पोलचिट वाटल्या त्यांच्यावर अन्याय होणार असले, त्यांनाच उमेदवारी मिळणार नसेल? तर त्यांना रडू येणारच. अशा पद्धतीने आमच्या जागा भाजप घेऊन अन्याय करणार असेल तर मग युती तोडलेली बरी, असा आक्रमक पावित्रा प्रदीप जैस्वाल यांनीही घेतला.
दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर शिवसेनेचे नेते युतीवर अंतीम निर्णय घेण्यासाठी पोहचले. पण नाराज राजेंद्र जंजाळ हे आपल्या संपर्क कार्यालयात जाऊन बसले. तिथे बाहेर त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी केली. जागा वाटपात राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांच्याच जागा सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे जंजाळ यांनी या निवडणुक प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवत माघार घेतल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.