

Mumbai News: नुकत्याच राज्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएम या पक्षानं 29 पैकी 13 महापालिकांमध्ये तब्बल 125 जागा जिंकून आणत सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना जे जमलं नाही, ते आता एमआयएमनं महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीत करुन दाखवलं. या दणदणीत यशानंतर आता एमआयएमच्या गोटातून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर आता एमआयएम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरणार आहे.त्यासाठी 12 जिल्हा परिषद अन् पंचायत समितींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीसाठी समितीही स्थापन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
एमआयएमनं एमआयएमनं महापालिका निवडणुकीत राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये तब्बल 125 जागा जिंकून सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे.सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले आले आहेत.त्यानंतर मालेगावमध्ये 21 नगरसेवक विजयी झाले आहेत. नांदेडमध्ये 15,अमरावतीत 12 तर मुंबई,सोलापूर,धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये प्रत्येकी 8 नगरसेवक विजयी झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्येही एमआयएमने सात जागा मिळवल्या आहेत.महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही एमआयएमची ही कामगिरी ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त करतानाच भाजप किंवा विरोधकांच्या इंडिया आघाडीसोबत जाणार नसल्याचंही स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ओवैसी म्हणाले,आमची लढाई आम्हाला जनादेश देणाऱ्यांसाठी असेल,सत्तेच्या समीकरणासाठी नसणार आहे. यावेळी एमआयएमच्या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि मतदारांना त्यांनी दिलं. त्यावेळी त्यांनी एमआयएम हे फक्त एकाच विशिष्ट वर्गाचा राहिला नसून काही हिंदू बांधव त्यात दलित,ज्यात अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातीचे उमेदवार आमच्या तिकिटावर जिंकल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात आता 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुका नेहमीच स्थानिक पातळीवर जोरदारपणे लढवल्या जात असतात. त्यात ग्रामीण भागात अतिशय महत्वाच्या समजल्या जात असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा राहिला आहे.आता भाजपनेही झेडपी आणि पंचायत समितींमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.
येत्या 5 फेब्रुवारीला होत असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी एमआयएम स्वबळावर की युती,आघाड्यांमध्ये लढणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण महापालिका निवडणुकीत ताकद दाखवलेल्या एमआयएम आता पुन्हा एकदा प्रमुख राजकीय पक्षांना धक्का देत आपला करिष्मा चालवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.