Abhijeet Dipke: 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात का दिसत नाही? अभिजीत दिपकेंनी अखेर केली मोठी घोषणा

Jharkhand Gen Z Student Protest: अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी नते महातो व इतर आंदोलकांवर पोलीसांकडून होणाऱ्या लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधल्यानंतर दिपके यांनी झारखंडमधील आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.
Abhijeet Dipke.jpg
Abhijeet Dipke.jpgSarkarnama
Published on
Updated on

CJP News : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात का जात नाही? त्यांची यावर नेमकी भूमिका काय? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात होते. दिपके यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असतानाच त्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो आणि त्यांच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांच्या धैर्य, चिकाटी आणि शक्तीला सलाम केला आहे.

अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी नते महातो व इतर आंदोलकांवर पोलीसांकडून होणाऱ्या लाठीहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महातो यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधल्यानंतर दिपके यांनी झारखंडमधील आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.

एका अत्यंत वेदनादायक घटनेत, विद्यार्थी नेते महतो, जे नऊ दिवसांच्या शांततापूर्ण उपोषणामुळे आधीच शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते. त्यांच्यावर पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या खाटेवरून प्रचंड वेदनेत बोलताना, झारखंडमधील महतो यांनी दिपके यांना त्या भयानक क्षणांची माहिती दिली जेव्हा पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हिंसक हल्ला केला. हे एक कडू सत्य आहे कि ज्या माणसाने शांततापूर्ण आंदोलनाचा मार्ग निवडला, त्याला अशा क्रूर शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागले.

Abhijeet Dipke.jpg
School Education news : अनुदानित खाजगी शाळांसाठी खूशखबर; शिक्षकेत्तर पदभरतीवरील स्थगिती उठविली, मान्यतेचा जीआर काढला...

उपोषणामुळे आधीच थकलेल्या शरीरावर झालेल्या या लाठीचार्जमुळे त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना चिरडण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्याच्या वृत्तीवर त्यांनी सडकून टीका केली आहे.

नवी दिल्लीतील जंतरमंतर असो वा झारखंडचे रस्ते, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशी अमानुष आणि क्रूर पोलीस दडपशाही करणे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. देवेंद्र भाई हे खरे नायक आहेत, जे विद्यार्थी वर्गासाठी स्वतःचा जीव पणाला लावत आहेत. सीजेपी त्यांच्या या न्याय्य लढ्यात खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही त्यांच्या विलक्षण धैर्याला, चिकाटीला आणि शक्तीला सलाम करतो.

Abhijeet Dipke.jpg
Syrian Court Sentences Assad: जग हादरलं..! 24 वर्षे सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयानं ठोठावली मृत्युदंडाची शिक्षा

पोलिसांच्या या मनमानी कारभाराची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिपके यांनी केली आहे. सरकारी दडपशाही किंवा शारीरिक बळाचा वापर करून युवक आणि विद्यार्थी वर्गाचा आवाज दाबता येणार नाही, असेही दिपके यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com