Syrian Court Sentences Assad: जग हादरलं..! 24 वर्षे सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना न्यायालयानं ठोठावली मृत्युदंडाची शिक्षा

Syria former president Bashar al-Assad: सीरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी माजी राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरवलं आहे. मात्र, न्यायालयानं ही शिक्षा सुनावताना ते तिथे उपस्थित नव्हते.
Syria court .jpg
Syria court .jpgSarkarnama
Published on
Updated on

Syria News: सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद, त्यांचे भाऊ माहेर अल-असद आणि चुलत भाऊ आतिफ नजीब यांना एका न्यायालयानं थेट मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. देशात सुमारे 14 वर्षे सुरू राहिलेल्या युद्धामध्ये जवळपास पाच लाख नागरिकांचा बळी गेला होता. या युद्धजन्य परिस्थितीत केलेल्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयानं सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सीरियातील एका न्यायालयानं देशातंर्गत संघर्षाच्या कालावधीत घडलेल्या गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी माजी राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरवलं आहे. मात्र, न्यायालयानं ही शिक्षा सुनावताना ते तिथे उपस्थित नव्हते.

सीरियात डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर सत्तांतर घडल्यानंतर २४ वर्षे सीरियावर राज्य गाजवलेल्या बशर अल-असद आणि माहेर यांनी देशातून रशियाची राजधानी मॉस्कोला पलायन केलं होतं.

सीरियातील दमास्कसमधील चौथ्या फौजदारी न्यायालयाने मंगळवारी(ता.11 ऑगस्ट) बशर अल-असद यांना पूर्वनियोजित हत्या, छळ आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. डिसेंबर 2024 मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बशर अल-असद सध्या रशियात निर्वासित जीवन जगत आहेत. न्यायालयाने त्यांना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली.

Syria court .jpg
Kolhapur Dcc Bank: कोल्हापूर जिल्हा बँकेचं बिगुल वाजलं, आमदार शिवाजी पाटलांच्या भूमिकेनं निवडणूक गाजणार

त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल-असद, जे सध्या रशियातच असल्याचे सांगितले जाते, यांनाही पूर्वनियोजित हत्या आणि छळाच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

बशर अल-असद यांच्या सरकारमधील परदेशात पळून गेलेल्या अनेक माजी लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनाही अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये अल-असद यांचे संरक्षणमंत्री फहद अल-फ्रीज आणि 2011 मध्ये दारा येथील लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख लुआय अल-अली यांचा समावेश आहे.

Syria court .jpg
Prakash Raj: कट्टर मोदी विरोधक अन् 'सुपरस्टार' प्रकाश राज यांना मोठा फटका; 'एसआयआर' प्रक्रियेनंतर मतदार यादीतून नावचं हटवलं

दक्षिण सीरियातील दारा प्रांतातील राजकीय सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख आतिफ नजीब यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. दारा येथे 2011 मध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेल्या हिंसक कारवाईत राजकीय सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख आतिफ नजीब यांची महत्त्वाची भूमिका होती. या कारवाईनंतरच सीरियातील आंदोलनाला मोठ्या आंदोलनाचं स्वरुप आले आणि पुढे देशात गृहयुद्ध ठिणगी पडली.

सीरियात सत्तांतर घडल्यानंतर सत्तेत आलेल्या नव्या सरकारनं बशर अल-असद यांच्या तत्कालीन सरकारमधील व्यक्तींवर खटले सुरू करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरचा हा माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दणका देणारा हा पहिलाच मोठा निकाल आहे.

दमास्कस येथील न्यायालयाचे न्यायाधीश अल-अरयान यांनी साक्षीदारांच्या जबाबांमधून माजी सीरियन राष्ट्राध्यक्षांची या गुन्ह्यांमधील भूमिका स्पष्ट झाल्याचं म्हटलं आहे. ते या गुन्ह्यांमागील "सर्वोच्च निर्णय घेणारे" होते आणि गुन्हे घडवून आणण्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर केल्याचा ठपकाही न्यायालयानं बशर अल-रसद यांच्यावर ठेवला.

सीरियात डिसेंबर 2024 मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर बशर अल-असद सध्या रशियात निर्वासित जीवन जगत आहेत. त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल-असद, जे सध्या रशियातच असल्याचे सांगितले जाते. यांनाही पूर्वनियोजित हत्या आणि छळाच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

सीरियाकडून रशियाकडे वारंवार बशर अल-असद यांना ताब्यात देण्याची मागणी केली आहे. मात्र, बशर अल-असद ते रशियाचे दीर्घकाळचे मित्र आणि सहकारी राहिले असून, सध्या त्यांना रशियाने आश्रय दिला आहे.

सीरियाच्या नव्या सरकारशी रशियाचे संबंध वाढत असले तरी, मॉस्कोने आतापर्यंत असद यांना सीरियाच्या ताब्यात देण्यास नकार दिला आहे. रशियाने त्यांना आश्रय दिल्याचे सांगितले जाते आणि ते सध्या रशियाच्या राजधानी मॉस्कोमध्ये ऐषारामाचे जीवन जगत असल्याच्या बातम्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com