Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंंद पानसरे हत्येप्रकरणी महत्त्वाची अपडेट; मुंबई उच्च न्यायालयाचा सर्व आरोपींंना मोठा दिलासा

Mumbai High Court : 16 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची कोल्हापुरातील राहत्या घरात गोऴ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
Govind Pansare
Govind PansareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची कोल्हापुरातील राहत्या घरात 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोऴ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जवळपास 10 वर्षांहून अधिक काळापासून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता. याचदरम्यान, 2 जानेवारी रोजी पानसरे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका निकाली काढली होती.आता कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील सहा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय दिला. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाकडून गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते. खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच पानसरे हत्येप्रकरणी तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपींना जामिनासाठी पात्र धरत असल्याचं निरीक्षणही मुंबई उच्च न्यायालयानं यावेळी नोंदवलं आहे.

Govind Pansare
Delhi Election 2025: 27 वर्षांचा वनवास संपला तर दिल्लीचा उपमुख्यमंत्री कोण? भाजपकडून 'ही' नावे आघाडीवर

काही दिवसांपूर्वीच दोन फरारी आरोपींबाबतचा तपास वगळता कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे. त्यामुळे, या प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख सुरूच ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले होते.

याप्रकरणी हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचा दावा करत आरोपींनी दाखल केलेल्या याचिकाही उच्च न्यायालयाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची कोल्हापुरातील राहत्या घरात गोऴ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Govind Pansare
Anjali Damania Video : 'अंजली दमानियांच्या मागे देवेंद्र फडणवीस...', स्वत:च सांगितली पडद्यामागची गोष्ट

नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी देखील पानसरे हत्येप्रकरणातील आरोपींचा संबंध होता. मात्र, महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरु असताना यश आलेलं नव्हतं. जेव्हा आरोपींना गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com