Sreejaya Chavan Entry in Politics : अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया राजकारणाच्या मैदानात उतरणार ?

Sreejaya Ashok Chavan in Politics : चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरणार
Sreejaya Chavan
Sreejaya ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या सक्रिय होऊन सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत काही किलोमीटर अंतर त्या चालल्याही. भारत जोडो यात्रेच्या नियोजनातही त्यांनी वडील अशोक चव्हाण यांना मदत केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदारसंघात श्रीजया चव्हाण या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या महिला मेळाव्यात त्यांनी पूर्णवेळ हजेरी लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला होता. भारत जोडो यात्रेपासूनच श्रीजया यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. स्वतः अशोक चव्हाण यांनी माझ्या मुलींना राजकारणात यायची इच्छा असेल तर मी त्यांना रोखणार नाही, असे स्पष्ट करीत त्यांच्यासाठी मार्ग खुला असल्याचे संकेत दिले होते. परंतु त्यांच्यावर मी कोणताही निर्णय लादणार नाही, हेही चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. (Sreejaya Chavan May Enter In Nanded Politics)

Sreejaya Chavan
Marathwada Congress News : मराठवाड्याची राजधानी काँग्रेसकडून दुर्लक्षितच

अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण याआधीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत, भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्वही केले होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या कन्या राजकारणात आल्या तर नवल वाटायला नको. राज्यातील बड्या नेत्यांनी आपल्या वारसांना राजकारणात सक्रिय केले आहे. नांदेड जिल्ह्यातील राजकारणात दबदबा असलेल्या चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील श्रीजया चव्हाण ह्या गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी राजकारणात अधिकृत एन्ट्री होते का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेडच्या राजकारणात चव्हाण कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री झाले होते, तर अशोक चव्हाण यांनीही दोन वेळा राज्याचे नेतृत्व केले आहे. या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व म्हणून श्रीजया चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. (Nanded Politics)

नुकत्याच पार पडलेल्या महिला मेळाव्याच्या नियोजनात श्रीजया चव्हाण ह्या सक्रिय होत्या. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानिमित्ताने आयोजित महिला मेळाव्यातील श्रीजया यांचा सहभाग आणि सक्रियता पाहता त्यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री होऊ शकते, असे बोलले जाते. नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशावेळी सध्या अशोक चव्हाण आमदार असलेल्या भोकर मतदारसंघातून श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री होऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. (Ashok Chavan Congress)

R...

Sreejaya Chavan
Dharashiv Loksabha News : धाराशिवमधून ठाकरेंच्या 'वाघा'शी महायुतीचा कोणता 'सिंह' झुंजणार?

काँग्रेस पक्षाच्या बैठका, सार्वजनिक कार्यक्रमात श्रीजया चव्हाण दाखवत असलेला रस पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चव्हाणांची तिसरी पढी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात दिसेल. माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांच्या जनसंपर्काची जबाबदारी सध्या त्या पार पाडत आहेत. येणाऱ्या काळातील लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच पक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.(Congress Nanded Politic)

Edited By : Rashmi Mane

Sreejaya Chavan
Congress Politics : बसवराज पाटलांचं चाललंय तरी काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com