Pradnya Satav : भाजप प्रवेशावरून काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव युटर्नच्या तयारीत? हिंगोलीच्या बंगल्यातून बाहेरही पडेनात!

Congress MLA Pragya Satav News : प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर सातव या नॉट रिचेबल झाल्या आहेत.
MLA Pradnya Satav News
MLA Pradnya Satav NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli politics news : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर सातव या नॉट रिचेबल झाल्या आहेत. सध्या हिंगोलीतच आपल्या निवासस्थानी असलेल्या प्रज्ञा सातव यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हाभरातील माध्यम प्रतिनिधी त्यांच्या घरासमोर जमा झाले आहेत.

मात्र ना प्रज्ञा सातव बाहेर येऊन माध्यमांना सामोरे जात आहेत, ना त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावर काही बोलायला तयार आहेत. भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने प्रज्ञा सातव अडचणीत आल्या आहेत की काय? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. प्रज्ञा सातव यांचे पती दिवंगत राजीव सातव यांचे गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध होते. राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती. भाजपचे (BJP) प्राबल्य असलेल्या गुजरातमध्ये राजीव सातव यांनी जोरदार टक्कर देत काँग्रेसची ताकद दाखवून दिली होती. राहुल गांधी यांनी सातव यांचे पक्षासाठीचे काम राष्ट्रीय युवक काँग्रेसपासून पाहिले असल्यामुळे त्यांना राज्यसभेची संधीही दिली होती.

MLA Pradnya Satav News
BJP Politics Video : भाजपने एकनाथ शिंदेंना खरे रंग दाखवले, फक्त 50 जागांवर बोळवण? 'त्या' ऑफरने गणित फिस्कटणार!

कोरोना काळात संसर्ग झाल्यामुळे अत्यंत तरुण वयात राजीव सातव यांचे निधन झाले होते. त्यानंतर सातव कुटुंबाला आधार देण्यासाठी राहुल गांधी स्वतः हिंगोलीत आले होते. काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण गांधी कुटुंब सातव परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पक्ष आणि आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास राहुल गांधी यांनी त्यावेळी प्रज्ञा सातव आणि कुटुंबाला दिला होता.

MLA Pradnya Satav News
Shivsena-BJP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ कोण? शिवसेना-भाजप युतीत जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा?

राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव (Pradnya satav) यांना दिलेला शब्दही पाळला आणि विधान परिषदेत त्यांना संधी दिली. वर्षभराचा कार्यकाळ प्रज्ञा सातव यांना मिळाल्यामुळे काँग्रेसने त्यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून पाठवले. हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असेपर्यंत दखल देत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी तेही भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे प्रज्ञा सातव यांना तसा जिल्ह्यात पक्षांतर्गत विरोधक कोणी उरला नव्हता. माजी आमदार भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांनीही नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सातव यांच्या मार्गातील हा अडथळा ही दूर झाला होता.

MLA Pradnya Satav News
NCP: मोठी बातमी: आधी सुप्रिया सुळेंचा फोन, मग शिलेदार पोहोचला भेटीला : अजितदादांना मिळाला दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचा प्रस्ताव

जिल्ह्यातील काँग्रेसचे एकहाती नेतृत्व हाती असताना प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल विरोधकांसह त्यांचे समर्थकही आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे प्रज्ञा सातव यांनी राज्य पातळीवरील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत हायकमांडकडूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केल्याचे बोलले जाते.

MLA Pradnya Satav News
Congress leader : "काँग्रेसला 'झिरो' करण्याचा विडा! अशोक चव्हाणांनी थेट 'हुकमी एक्का'च फोडला; भाजपच्या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ."

काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव या समाधानी नसल्याचेही बोलले जाते. सातव यांचा विधान परिषदेतील विजय हा काठावरचा असल्याने आपल्यासाठी भविष्यात ही धोक्याची घंटा ठरू शकते, हा विचार करत प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या माध्यमांवर आल्यानंतर सातव यांनी माध्यमांना टाळत स्वतःला आपल्या निवासस्थानामध्ये बंद करून घेतले आहे.

MLA Pradnya Satav News
Ajit Pawar Politics: `भुजबळ फार्म` राष्ट्रवादीचे केंद्र; इच्छुकांच्या मुलाखती आधीच रंगल मानापमान नाट्य! निवडणुकीवेळी कसं व्हायचं?

सातव यांचा फोन नॉट रिचेबल असून त्यांनी आपले पीए, पदाधिकारी आणि समर्थकांनाही माध्यमांशी बोलण्यास मज्जाव केल्याची समजते. भाजप प्रवेशाच्या बातम्या आल्यानंतर राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधून त्यांना या निर्णयाबद्दल विचारणा केल्याची कुजबुज सुरू आहे.

MLA Pradnya Satav News
Ajit Pawar NCP : भाजपसोबत जुळलं नाही, शरद पवारही जवळ करेनात...; अजितदादांची राष्ट्रवादी पडली एकाकी

मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरत असताना प्रज्ञा सातव यांनी बाळगलेल्या मौनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप प्रवेशाचा प्रज्ञा सातव यांच्याकडून फेरविचार केला जाऊ शकतो, असेही बोलले जाते. तूर्तास प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये जाण्याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने त्यांनी प्रवेशावरून युटर्नच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

MLA Pradnya Satav News
BJP vs Shivsena UBT: 'मोदी-शहांना ज्या नावात रस होता, त्याला संघांची मान्यता नव्हती, नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीने भाजपांतर्गत खळबळ...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com