Latur Zilla Parishad: लातूरमध्ये काँग्रेस अन् वंचित आघाडीचे बिनसले! नाराज कार्यकर्त्यांचा उद्रेक रोखण्यासाठी नेत्यांची धावाधाव
Latur News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची लगीनघाई संपली आहे. मात्र, लातूर महापालिकेसाठी काँग्रेस अन् वंचित आघाडीची युती झाली. या आघाडीला महापालिका निवडणुकीत मोठे यशही मिळाले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अद्यापही या दोन्ही पक्षांची युती झाली नाही.
त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत आता काँग्रेस–वंचित आघाडी होणार की नाही याची उत्सुकता ताणली गेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांचा उद्रेक रोखण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरु आहे.
आता दोन्ही पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी सुरु आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत बहुमतासह सत्ता मिळवली होती. या दोन्ही पक्षाच्या युतीला 70 पैकी 47 जागा मिळाल्या आहेत.
लातूर महानगरपालिकेत काँग्रेस (Congress) आणि वंचित बहुजन आघाडीचा महापौर होणार आहे. तर या निवडणुकीत तर भाजपला 22 जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीच्या बळावलेला दिसतो. त्यामुळे काँग्रेसकडून आता स्वबळाची चाचपणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्याशी युती झाल्याचे स्पष्ट करताना आमदार अमित देशमुख यांनी शेतकरी संघटना राजू शेट्टी, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत यांच्याशीही आघाडी झाल्याची माहिती दिली. मात्र, वंचित बहुजन आघाडीसोबतची युती अद्याप अंतिम टप्प्यावर पोहोचलेली नसून, काही जागांवर तिढा कायम असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली.
भाजपबद्दलचा मतप्रवाह बदलतोय : अमित देशमुख
भाजपबाबत लोकांमध्ये आता मत तयार झाले आहे. महापालिकेतही ते दिसून आले आहे. लोकांचा भाजपबद्दलचा मतप्रवाह बदलत असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली. पक्षातून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी सुरु असून, त्यांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी चर्चा केली जात असल्याचेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

