Devendra Fadnavis Drought Visit : 'साहेब, सगळं गेलं..जगायचं कसं? आता तुम्हीच आम्हाला..', शेतकऱ्यांचा CM फडणवीसांसमोर टाहो

Devendra Fadnavis visited drought-hit Marathwada: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. निलंगा तालुक्यात शेतकऱ्यांनी पीक नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मांडला.
Devendra Fadnavis visited drought-hit Marathwada
Devendra Fadnavis visited drought-hit MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

CM visit in drought Marathwada : पेरणीला हजारो रूपये खर्च केला, बोअर आटला, साठ फूट खोल असलेली विहीर कोरडी पडली, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही. जनावरे बाजारात कोणी विकत घेत नाही. सोयाबीन, उडीद, तुर करपून गेलं, लेकराचे शिक्षण कसं करावं, लाख रुपये दिले तरी आमचे नुकसान भरून येणार नाही. साहेब आता तुम्हीच आम्हाला वाचवा असे म्हणत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपाशी आपली व्यथा मांडली.

सगळं गेलं आता जगायचं कसं? असा सवाल करत टाहो फोडणारा शेतकरी आणि त्याला कवटाळत धीर देणारे मुख्यमंत्री, असे चित्र आज मराठवाड्यातील बांधा बांधावर दिसले. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या भागाचा दौरा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. निलंगा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस यांना पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.

नूर बाबा मिया पटेल यानी मुख्यमंत्र्यांसमोर भरलेल्या डोळ्यांनी आपली कैफियत मांडली. आसमानी संकटामुळे कायम दुष्काळाची टांगती तलवार असलेल्या शेतकऱ्यावर यंदाही तलवार कोसळणारच असे चित्र शेता शेतात दिसू लागले आहे. मुख्यमंत्री बांधावर आलेले पाहताच शेतकऱ्याने त्यांच्यासमोर हात जोडत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे याची जाणीव असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नूर बाबा पटेल यांचा हात धरत त्यांना कवटाळले. कितीही मोठे संकट येऊ द्या सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा धीर देत त्यांनी मायने शेतकऱ्याच्या पाठीवरून हात फिरवला.

Devendra Fadnavis visited drought-hit Marathwada
Maharashtra Political Live Update : संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस; कारवाईची मंत्री गिरीश महाजन यांची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंगा येथील दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. त्यांनी अक्षय कुमार हिरास यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यानंतर नूर पटेल यांच्या विहिरीची पाहणी केली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, संजय बनसोडे, आमदार बसवराज पाटील मुरूमकर, अभिमन्यू पवार, खासदार ओमराजे निंबाळकर आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली. हे पीक पूर्णतः वाया गेले आहे. उपस्थित शेतकऱ्यांनी हातात करपून गेलेली पिके, वाळलेला ऊस मुख्यमंत्र्यांना दाखवला. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, यंदा कोरडा दुष्काळ पडला आहे. सर्वच पिके हातून गेली आहेत. आता आम्ही जगावं कसं?असा प्रश्न शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केला.

Devendra Fadnavis visited drought-hit Marathwada
Devendra Fadnavis : CM देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, आजपासून दुष्काळ दौऱ्यावर; मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सकाळी परिस्थितीची पाहणी केली. काही भागात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. जनावराच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. विहीर बोअर बंद पडले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा मराठवाड्यात झाल्याने याभीषण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com