Devendra Fadnavis : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘सरसकट मदत देणार’

Devendra Fadnavis assured blanket relief for drought-hit farmers in Marathwada: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय काढण्याचेही त्यांनी लातूर दौऱ्यात स्पष्ट केले.
Devendra Fadnavis assured blanket relief for drought-hit farmers in Marathwada
Devendra Fadnavis assured blanket relief for drought-hit farmers in MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

CM Visit In Marathwada : मराठवाड्यातील लातूर, धाराशीव जिल्ह्यात पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकट मदत देण्याचे आश्वासन दिले. कुठल्याही प्रकारे आढेवेढे घेतले जाणार नाही, शेतकऱ्यांना सरकट मदत केली जाईल, असा शब्दच मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामळे संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर आला आहे.

कळंब तालुक्यातील मलकापूर येथील पीक नुकसानीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. दुष्काळाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करावे. या संकटाच्या काळात राज्य सरकार पूर्णपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहील. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कळंब तालुक्यातील मलकापूर येथे आज रामहरी लोमटे आणि संजय लोमटे यांच्या शेतातील नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाची परिस्थिती सरसकट असल्याने मदतही सरसकट देण्यात येणार आहे. मदत देताना कोणतेही आढेवेढे घेतले जाणार नाहीत.

पंचनामे कायदेशीर प्रक्रियेनुसार करावे लागतील. मात्र, परिस्थिती सरसकट असल्याने मदतीचा निर्णयही सरसकटच असेल. दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा,मुलांचे शिक्षण आणि अन्नधान्य यांची व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल. शेतकऱ्यांना देण्यात येणारे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.

Devendra Fadnavis assured blanket relief for drought-hit farmers in Marathwada
Devendra Fadnavis: CM देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा, दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढतो...

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत कर्जमाफी सुरू राहील. शेतकऱ्यांच्या वीजबिलापोटी ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या या संकटात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही सरकारची भूमिका आहे.

Devendra Fadnavis assured blanket relief for drought-hit farmers in Marathwada
DBT Assistance: चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट डीबीटीद्वारे मदत? यापूर्वीच्या अनुभवांमुळे राज्य सरकारकडून नव्या व्यवस्थेचा विचार

राज्य सरकार शेतकर्‍यांना आवश्यक ती सर्व मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार बसवराज पाटील, राणाजगजीतसिंह पाटील, कैलास घाडगे पाटील, प्रवीण स्वामी आदींची यावेळी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com