DBT Assistance: चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांना थेट डीबीटीद्वारे मदत? यापूर्वीच्या अनुभवांमुळे राज्य सरकारकडून नव्या व्यवस्थेचा विचार

Maharashtra may consider DBT assistance for livestock owners: दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा छावण्यांची मागणी वाढत असताना, मागील अनुभवातील गैरव्यवहार आणि थकीत बिलांच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना थेट डीबीटीद्वारे मदत देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.
Maharashtra may consider DBT assistance for livestock owners
Maharashtra may consider DBT assistance for livestock ownersSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra drought: संभाव्य पाणीटंचाईमुळे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, भूकाळातील चारा छावण्यांतून गैरव्यवहार आणि थकीत बिलांचा वाईट अनुभव पाहता, आता छावण्यांऐवजी थेट पशुपालकांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे (डीबीटी) मदत जमा करावी, अशी मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चारा छावण्यांचा विषय बैठकीत उपस्थित केला. “चारा छावण्यांना सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत दिली जाते; मात्र तेथे अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतात. त्यामुळे या वेळी छावण्यांऐवजी थेट 'डीबीटी'चा विचार करावा,” अशी सूचना त्यांनी केली. काही मंत्र्यांनीही या सूचनेला दुजोरा दिला.

गांभीर्याने विचार सुरू

तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या छावण्यांची विलेखीत तपासणी अभावी अजून प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे अहवाल लक्षात घेता, पुढील काळात छावण्यांऐवजी पशुपालकांच्या खात्यावर थेट निधी वर्ग (डीबीटी) करण्याबाबत सासन गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

Maharashtra may consider DBT assistance for livestock owners
Narhari Zhirwal : 'साहेब सगळी पीकं करपली, एकरी पन्नास हजार मदत द्या', पालकमंत्री नरहरी झिरवळांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश!

दीडशे आमदारांचे पत्र

राज्यभरातील शेतकरी दुष्काळामुळे हतबल झाल्याचे चिन्ह राज्यभरात आहे.त्यामुळे विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांसोबतच आता सत्ताधारी व विरोधी अशा जवळपास १५० आमदारांनी कृषिमंत्र्यांना पत्र देऊन राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra may consider DBT assistance for livestock owners
Devendra Fadnavis: CM देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा, दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढतो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com