Tiranga Yatra : फडणवीसांसमोर गर्दीचा फुगा फुगवण्यासाठी दहावीच्या पोरांचा वापर; दुपारपासून चौकात बसवणार; यादीच समोर

Devendra Fadnavis Tiranga Yatra : ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाचे फोटोही शेअर केले आहेत.
Devendra Fadnavis Tiranga Yatra
Devendra Fadnavis Tiranga Yatra
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 14 Aug : छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रेवरून राजकारण तापले आहे. पक्षाच्या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणून त्यांचे मोबिलायझेशन केले जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर केला आहे.

हा सरकारचा नव्हे, तर भाजपचा पक्षीय कार्यक्रम असून त्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर जोरदार टीका केली. भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे 'जगातील सर्वात मोठा पक्ष'! छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता दहावीचे मुलं कार्यक्रमासाठी दुपारी १२ पासून क्रांती चौकात आणून बसवले जाणार आहेत. ही फक्त एकाच शाळेची यादी, अगदी मोबाईल नंबर सहित. मुलांच्या करिअरचं, परीक्षेचं काय व्हायचं ते होवो.. साहेबांसमोर गर्दीचा फुगा कसा फुगवायचा एवढाच काय तो येथील भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'!", अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis Tiranga Yatra
Aditya Thackeray : राम मंदिराप्रमाणे कुंभमेळ्यातही 'चंदाचोरी'; ठाकरेंचा महाजनांवर हल्लाबोल, म्हणाले "भाजपच्या नगरसेवकांना रस्त्यात अडवून..."

दरम्यान, मराठवाडा, खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.

या यात्रेची विशेष रचना करण्यात आली असून हातात तिरंगा घेऊन तरुणांचा एक गट सर्वात पुढे राहणार आहे. त्यामागे भाजपचे पदाधिकारी, मंत्री आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. यात्रेच्या तयारीसाठी २०० हून अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, शहरात १३ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis Tiranga Yatra
Rahul Gandhi : मेलोनी समजून तर पकडलं नाही ना? काँग्रेस नेत्याकडून राहुल गांधींसमोरच थेट PM मोदी-मेलोनी भेटीची खिल्ली, वाद पेटला

मराठवाड्यातील या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सात मंत्री आणि ५० हून अधिक आमदार सहभागी होणार असल्याची माहिती आहे. मात्र, या यात्रेसाठी शालेय विद्यार्थ्यांना आणले जात असल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप समोर आल्यानंतर आता या कार्यक्रमावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com