

Nashik News, 14 Aug : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. तेच नाशिकच्या दुरावस्थेला गैरकारभार आणि भ्रष्टाचाराला कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला.
नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. खर्च कुठे आणि कसा होणार आहे हेच जनतेला माहित नाही. सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांवर होणारा खर्च हा गंभीर विषय आहे. यामध्ये आतापासूनच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःच त्याबाबत खुलासे करीत आहेत. त्यामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोऱ्यांप्रमाणेच कुंभमेळ्यातही भाजपला "चंदाचोरी" करायची आहे हे स्पष्ट आहे. आपण सगळ्यांनीच श्रीराम मंदिराला पाठिंबा आणि दान दिले आहे. त्यामुळे त्या दानाचे काय झाले? हे विचारण्याचा अधिकार आपल्याला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने श्रीराम मंदिरासाठी योगदान दिले. हे भाजपवाले नाकारू शकतात काय?
अयोध्येत झालेली चंदाचोरी हा अत्यंत गंभीर आणि वाईट विषय आहे. त्याविषयी आता जनताही दुःखी झाले आहे. याबाबत भाजपच्या नगरसेवकांना रस्त्यात अडवून जाब विचार, असे ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते. त्याची आज काय अवस्था आहे? असे दत्तक घेतले जात असेल तर काय म्हणणार? असा प्रश्न त्यांनी केला.
शहराविषयी आस्था आणि नागरिकांची काळजी आहे का? असा सवाल त्यांनी भाजपला केला. संजय राऊत 17 ऑगस्टला महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत. सत्ताधाऱ्यांनीही शहराची काळजी असेल तर त्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आव्हान त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.