Mumbai News : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा रविवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची धावपळ पाहवयास मिळाली. विशेषतः कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच लगभग पाहवयास मिळाली. सभागृहात ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाणे यांच्यावरील हल्ल्याबाबत परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी सविस्तर भाष्य केले.
सभागृहात त्यांनी ॲड. मंगेश ससाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात तात्काळ व मोजक्या शब्दांत उत्तर दिले.
महाराष्ट्रात आजघडीला सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरु शकत नाही. या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे, का असा प्रश्न धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात विचारला. ओबीसी आंदोलक, प्रसिद्ध वकील व ओबीसी आंदोलन अभ्यासक मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला झाला. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. यामधील एकही आरोपी पकडला गेलेला नाही. ओबीसी आंदोलक वाघमारे यांच्यावरही हल्ला झाला होता, असे मुंडे म्हणाले.
आजघडीला महाराष्ट्रात सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरु शकतो का?, हा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे. एकमेकांना मारुन सोशल मीडियावर स्टेटस ठेवली जातात, मारहाण करणाऱ्यांना योद्धा म्हटले जाते. त्यांना अटक होत नाही. एकाला शिक्षा होते. परंतु, सारखाच गुन्हा असलेल्या दुसऱ्याला शिक्षा होत नाही. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे की नाही, हा प्रश्न पडतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.
मुंडेंनी विचारलेल्या या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सभागृहात तात्काळ उत्तर दिले. परंतु, फडणवीस यांचे हे उत्तर मोजक्या शब्दांत होते. अध्यक्ष महोदय, यासंदर्भात कटू कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ॲड. ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ससाणे यांची गाडी थांबवून दगडफेक केली. ॲड. ससाणे यांनी तात्काळ धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिली. त्यावरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.