Dhangar Reservation : धनगर समाजाचा मोठा निर्णय; आरक्षणासाठी 'या' दिवशी आझाद मैदानावर उपोषण

Mumbai Azad Maidan : आरक्षण दिंडीत समाज बांधवांसह महिला, मेंढ्या, कुत्रे, घोड्यांचाही सहभाग
Dhangar Reservation
Dhangar ReservationSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शनिवारी (ता. १७) चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करुन मुंबईकडे कुच करण्यात येईल. त्यानंतर २२ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी (ता. ११) इशारा सभेत करण्यात आली.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhangar Reservation) सरकारने नेमलेल्या शिंदे समितीचे कामकाज अगदीच संथ आहे. समितीने केवळ दोन राज्यांचा दौरा केला आहे. त्यामुळे समाजाच्या आरक्षणासाठी सरकाला इशारा देण्यासाठी आज रविवारी इशारा सभा झाली. छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकुलाच्या मैदानावर ही सभा पार पडली.

Dhangar Reservation
Bihar Politics : फ्लोअर टेस्टपूर्वी नितीशकुमारांचं टेन्शन वाढलं, 3 आमदार गायब; गडबड होणार?

दरम्यान, आरक्षण दिंडीत समाज बांधवांसह महिला, मेंढ्या, कुत्रे, घोडे, कुऱ्हाडींसह सहभाग असेल. या उपोषणाला 22 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवीची शपथ घेऊन धनगर समाजाच्या (Dhangar Samaj) आरक्षणाची घोषणा करेपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे सभेतून सांगण्यात आले. सभेत सरकार विरोधात राळ उठविण्यात आली.

या सभेला पट्टण कडोली येथील विठ्ठल बिरुदेव संस्थानचे मठाधिपती फरांडे महाराज, बाळासाहेब दोडतले, यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दोगडे, यशपाल भिंगे, अण्णासाहेब रुपनर, राष्ट्रवादीच्या प्रा. सुशिला मोराळे, एमआएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक आदींची उपस्थिती होती.

(Edited by Sunil Dhumal)

Dhangar Reservation
Eknath Shinde : दाढी हलकी समजू नका; दाढीची काडी फिरवली तर लंका जाळून टाकेल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com