Dharashiv Loksabha Big Update : ...तर ओमराजे अन् अर्चना पाटलांचे उमेदवारी अर्ज बाद होणार!

Loksabha Election 2024 : धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण...
Archana Patil, Omraje Nimbalkar
Archana Patil, Omraje Nimbalkar Sarkarnaam

Dharashiv Political News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महायुतीत अनेक खल झाल्यावर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे आली.

उमेदवारांच्या अनेक नावांमधून अखेर भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तेथे ओमराजे विरुद्ध अर्चना पाटील अशी चुरशीची लढत होत आहे. पण आता याचवेळी धाराशिवमधील ठाकरेंच्या शिलेदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.

धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण आता त्यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. ओमराजे आणि अर्चना पाटील यांनी मंगळवारी (ता.16) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

मात्र,ओमराजे आणि अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या एबी फॉर्म आणि मालमत्ता प्रमाणपत्रामध्ये चुका आहेत. तसेच इतरही त्रुटी आढळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Archana Patil, Omraje Nimbalkar
Lok Sabha Election 2024 : मुनगंटीवारांच्या प्रचाराला येऊन 'ओबीसी' उमेदवाराला पाडू नका; भुजबळांना कुणाचा फोन?

धाराशिवचे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र, 19 एप्रिलपर्यंत त्रुटींची पूर्तता झाली नाही तर, दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच दोन्ही उमेदवारांना समज दिल्याची माहिती आहे.

ओमराजे निंबाळकरांनी आपल्या 'निष्ठे'ची सारी ताकद रस्त्यावर उतरवून, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) बोलावून, रोहित पवार आणि अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर ठाकरे गटाची जाहीर प्रचार सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या वेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये आमदार कैलास पाटील हे पूर्णवेळ सहभागी झाले होते. ते एका वाहनातून लोकांना अभिवादन करत होते. दरम्यान ट्रकवरून उतरून सभा मंचाकडे जात असताना, त्यांना अचानक भोवळ आली आणि ते कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

R

Archana Patil, Omraje Nimbalkar
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या मैदानात 'या' वाघिणी फोडताहेत पुरुष प्रतिस्पर्ध्यांना घाम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com