Dharashiv Shiv Sena News : शिवसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर 'धाराशिव' नगरपालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट; शिंदेंनंतर भाजपही 'अ‍ॅक्शन मोड'वर, गटनेत्यासाठी टाकलं जाळं?

Dharashiv Politics News : धाराशिव पालिकेतील समीकरण बदलले असून एकही नगरसेवक नसलेल्या शिवसेनेचे संख्याबळ आता चार झाले आहे. त्यातच आता पाचवा नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.
Dharashiv BJP, Shivsena Leader
dharashiv bjp, shivsena leader Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Politics News : धाराशिव नगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मोठा धक्का दिला आहे. बुधवारी रात्री सातपैकी 4 नगरसेवक गळाला लावले आहेत. या चार नगरसेवकानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता धाराशिव पालिकेतील समीकरण बदलले असून एकही नगरसेवक नसलेल्या शिवसेनेचे संख्याबळ आता चार झाले आहे. त्यातच आता पाचवा नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. विशेषता हा पाचवा नगरसेवक गटनेता असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. तर उर्वरित दोन नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

धाराशिव नगरपालिकेतील ठाकरेंचे चार नगरसेवक मंगळवारी भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघाले होते. मात्र, रस्त्यातच नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर या ठाकरे सेनेचे चारही नगरसेवक भाजपसोबत गेले नाहीत. अर्ध्या वाटेतून परतत असताना खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी गेम फिरवला. या चार नगरसेवकांना सोबत घेत बुधवारी ठाण्यात जाऊन पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला.

प्रवेश केलेल्या या चार नगरसेवकात प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे व करवर यांचा समावेश आहे. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह सहसंपर्कप्रमुख सुरज महाराज साळुंके, ऋषी मगर, सोमनाथ गुरव यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थितीत होते.

Dharashiv BJP, Shivsena Leader
Parbhani Politics : खासदार जाधवांचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का? 'ते' 18 नगरसेवक शिंदेसेनेत जाणार, थेट महापालिकेतील सत्ता समीकरणच बदलणार?

चार जणांनी शिवसेनेसोबत गेले आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते राजाभाऊ पवार यांनी गुरुवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे धाराशिव नगरपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचा व पक्षप्रवेशाचा घटनाक्रम सुरु असताना गटनेते राजाभाऊ पवार यांनी ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, युवा नेते मल्हार पाटील, मनोगत शिनगारे हे उपस्थितीत होते. एकीकडे ठाकरेंचे 4 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात गेले असताना पवार हे त्यांच्यासॊबत येतील असे वाटत असताना ते भाजपच्या वाटेवर असल्याचे या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. गटनेते म्हणुन पवार हे भाजपच्या माध्यमातून कोणती कायदेशीर खेळी खेळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dharashiv BJP, Shivsena Leader
Nashik Politics : ठाकरेंचे 12 नगरसेवक शिदेंच्या गळाला लागलेच होते ; ऐनवेळी भाजपनेच फिरवला खेळ? नाशिकच्या राजकारणात इनसाइड गेम !

दुसरीकडे सात पैकी पाच नगरसेवक शिवसेना सोडून जाणार हे जवळपास निश्चित झाले असताना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत दोन शिलेदार राहणार आहेत. तसे नगरसेवक रवी वाघमारे, राज निकम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेसोबत पाच तर ठाकरे सेनेसोबरत दोन तर भाजपसॊबत एक नगरसेवक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचे गटनेत्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com