Dharashiv municipal election : धाराशिव रणधुमाळी! जिल्ह्यातील नेत्यांचे नातलग उतरले आखाड्यात; नगरपालिकेच्या महासंग्रामाकडे राज्याचे लक्ष!

Maharashtra politics latest News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला चार वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे.
Kiran gaikwad, vishvjeet patil, samrjeetsinh thakur
Kiran gaikwad, vishvjeet patil, samrjeetsinh thakur Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला चार वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात उतरली आहे. माजी खासदार व शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र गायकवाड, भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, दिवंगत नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव तर माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने उत्सुकता लागून राहिली आहे.

परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीत दिवंगत नेते व शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र विश्वजीत पाटील रिंगणात उतरले आहेत. परंडा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते नशीब आजमावत आहेत. त्यांना भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस या सर्व पक्षाचा पाठींबा आहे. त्यांची लढत माजी मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक व माजी नगराध्यक्ष झाकीर सौदागर यांच्यासोबत होत आहे.

Kiran gaikwad, vishvjeet patil, samrjeetsinh thakur
BJP Congress clash Mumbai : मुंबईमध्ये भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा-समोर; अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर राडा

परंडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे (BJP) माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांचे चिरंजीव समरजीत ठाकूर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परंडा येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपकडून ते नगरसेवकपदाची पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Kiran gaikwad, vishvjeet patil, samrjeetsinh thakur
Shivsena Vs BJP : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या नेत्याकडून मारहाण, ऐन निवडणुकीपूर्वी ठाण्यातलं वातावरण तापलं

उमरगा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव व शिंदे यांच्या युवा शिवसेनेचे किरण गायकवाड हे रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत याठिकाणी भाजपचे हर्षवर्धन चालूक्य व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे रज्जाक अत्तार यांच्यासोबत होत आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Kiran gaikwad, vishvjeet patil, samrjeetsinh thakur
NCP SP Politics : शरद पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांचे नाव घेत कोट्यावधींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप

मुरुम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात माजी मंत्री व भाजपचे नेते बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून नशीब अजमावत आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात होत असलेल्या या सर्वच लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होत आहे.

Kiran gaikwad, vishvjeet patil, samrjeetsinh thakur
BJP Congress clash Mumbai : मुंबईमध्ये भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा-समोर; अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर राडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com