Dharashiv ZP president race: एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका, आता माघार नाहीच! सत्तेसाठी 'हा' फॉर्म्युला पाळा! धाराशिव 'झेडपी'मध्ये मोठा ट्विस्ट

Devendra Fadnavis decision News : महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्य कोकणात सहलीवर गेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य पुण्यात सहलीवर असल्याचे समजते. त्यातच आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नवा फॉर्म्युला सुचवला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव जिल्हा परिषदेच्या निकालात महायुतीने बाजी मारली आहे. त्यामुळे महायुती सत्तास्थापन करेल असे वाटत होते. मात्र, गेल्या आठ दिवसापासून महायुतीच्या मित्रपक्षात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्य कोकणात सहलीवर गेले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य पुण्यात सहलीवर असल्याचे समजते. त्यातच आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नवा फॉर्म्युला सुचवला आहे. या प्रस्तावावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे समजते. मात्र, धाराशिव झेडपीच्या अध्यक्ष पदाचा तिढा मुंबई दरबारी सीएम फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यापासून झेडपीचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी भाजपकडून निवडून आलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील व शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे या पदासाठी या दोघींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स कायम आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Pune Congress BJP : काँग्रेस भवन बाहेर तुफान राडा! भाजप आक्रमक, सपकाळांचे टिपू सुलतानच्या वेशातील फोटो झळकावले

त्यातच आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्तास्थापन करण्यासाठी नवा फॉर्म्युला सुचवला आहे. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच–अडीच वर्षांचा फॉर्म्युला त्यांनी भाजपसमोर ठेवला आहे. त्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार अडीच वर्षे भाजपकडे अध्यक्षपद, तर उर्वरित अडीच वर्षे शिवसेनेकडे (Shivsena) राहील. भाजपचा अध्यक्ष असताना शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि शिवसेनेचा अध्यक्ष असताना भाजपचा उपाध्यक्ष राहील सुचवले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
BJP Vs Shivsena UBT : हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मुस्लिम महापौर; भाजपने दाखवला आरसा; ही तर 'जनाब सेना' म्हणत डिवचले!

दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सभापती पद देऊन सत्तेत सामावून घेण्याचीही तयारी आहे. या प्रस्तावावर राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेणार असून, दोघांची मुंबईत रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबई दरबारी धाराशिव जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरणांवरून निर्णय होणार असल्याचे समजते. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nashik NCP : सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर हालचाली, हेमलता पाटील यांच्या नाराजीनाट्यावर तुर्त पडदा

दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर येथील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना सत्तास्थपनेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली असतानाच शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा गट हा भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Congress Setback : काँग्रेसमध्ये भूकंप, सामुहिक राजीनामा अस्त्र, पक्षांतर्गत वाद उफळला; तब्बल 17 पदाधिकारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com