NCP News : राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या धोंडे जेवणात नृत्यांगणा नाचवल्या; आमदार चिखलीकरांना पाठ फिरवताच....

Dhonde Jevan Event Loha : अधिक मासा सारख्या पवित्र महिन्यात जावयांना धोंडे देण्याची परंपरा आहे. परंतु अशा धार्मिक कार्यक्रमात व्यासपीठावर नृत्यांगणा नाचवल्याने टीका करण्यात येत आहे.
A traditional Dhonde Jevan event in Loha has become the center of controversy following a dancers' performance that triggered political reactions
A traditional Dhonde Jevan event in Loha has become the center of controversy following a dancers' performance that triggered political reactionssarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics News : सध्या अधिक मासानिमित्त सर्वत्र धोंडे जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्याची राजकारण्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. त्यात विधान परिषदेची निवडणूक झाल्याने या धोंडे जेवणांना बहर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच तारखेला धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र चिखलीकरांची पाठ फिरताच व्यासपीठावर चक्क नृत्यांगणा नाचवल्या गेल्याने एकच खळबळ उडाली.

धोंडे जेवण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लावलेल्या मोठ्या फ्लेक्सवर आमदार प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर यांचे भले मोठे छायाचित्रही लावण्यात आले होते. स्वतः नगराध्यक्ष शरद पवार यांचाही फोटो त्यावर झळकत होता.

अधिक मासा सारख्या पवित्र महिन्यात जावयांना धोंडे देण्याची परंपरा आहे. परंतु अशा धार्मिक कार्यक्रमात व्यासपीठावर नृत्यांगणा नाचवल्याने नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल लोह्यात संताप पसरला आहे. व्यासपीठावरील हिडीस नृत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून या कृतीचा निषेध केला जात आहे.

दरम्यान, नाचगाण्याचा हा कार्यक्रम आमदार प्रताप पाटील चिखलीकर व्यासपीठावरून निघून गेल्यानंतर झाल्याचे बोलले जाते. लोहा नगरपरिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. नगराध्यक्ष शरद पवार हे आमदार चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याच समर्थकाकडून धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात असा प्रकार घडल्याने लोह्यामध्ये 'हीच का तुमची संस्कृती'? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

A traditional Dhonde Jevan event in Loha has become the center of controversy following a dancers' performance that triggered political reactions
Shivsena Politics : ठाकरेंचा खासदार गैरहजर, एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? मोठ्या नेत्याने सुनावलं, 'आमच्यामुळे...'

'राष्ट्रवादी'मध्ये चुप्पी?

घडलेल्या या प्रकाराबद्दल अद्याप प्रताप पाटील चिखलीकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. धोंडे जेवणा निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठाव चक्क तीन ते चार नृत्यांगणा अश्लील हावभाव करत नाचत असल्याने अनेकांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचेही सांगीतले जाते.

A traditional Dhonde Jevan event in Loha has become the center of controversy following a dancers' performance that triggered political reactions
Marathwada Shivsamvad tour: निवडणुकीच्या नादात 22 गुंठे जमीन विकली, भाजप उमेदवाराकडून पराभव; संकटात सापडलेल्या शिवसैनिकाला मदतीचा हात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com