Shivsena Politics : ठाकरेंचा खासदार गैरहजर, एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? मोठ्या नेत्याने सुनावलं, 'आमच्यामुळे...'

Chandrakant Khaire Bhausaheb Wakchaure : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा शिर्डीत पार पडला. मात्र, या मेळाव्याला स्थानिक खासदारच गैरहजर राहिल्याने ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Shiv Sena UBT leader Chandrakant Khaire criticizes MP Bhausaheb Wakchaure over his absence from the party gathering.
Shiv Sena UBT leader Chandrakant Khaire criticizes MP Bhausaheb Wakchaure over his absence from the party gathering.sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी असताना संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा मंगळवारी पार पडला. अहिल्यानगरमध्ये सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते. मात्र, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या मेळाव्याला दांडी मारल्याने वेगळ्याच चर्चा सुरू आहेत.

मागील काही काळापासून खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे मेळाव्यातील त्यांच्या गैरहजरेंनी संशय अधिक बळवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या मेळाव्यातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाकचौरे यांना सुनावले.

खैरे म्हणाले, 'मेळाव्याला आज खासदार दिसत नाहीत, कदाचित कुठे गावाला गेले असतील. ते आजही अधिकृतपणे कुठे गेले नाहीत अस मला वाटतं, त्यांनी जाऊ नये ही माझी विनंती, बाकी त्यांची मर्जी.'

यापूर्वी देखील एकदा असं झालं होतं. मात्र, दोघा नवरा बायकोला बोलावून मी दिल्लीत चर्चा केली होती. त्यांना तिकीट देण्यात माझा मोठा वाटा होता. त्यावेळी उद्धवसाहेबांनी तुम्हाला माफ करत तिकीट दिलं होतं, याची आठवण देखील खैरे यांनी खासदार वाकचौरे यांना करून दिली.

Shiv Sena UBT leader Chandrakant Khaire criticizes MP Bhausaheb Wakchaure over his absence from the party gathering.
Maharashtra MLC election: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात राजकीय भूकंपाची नांदी! राष्ट्रवादीची पीछेहाट अन् शिवसेनेचा वाढता आलेख

ताकदीने लढणार...

अंबादास दानवे यांनी या मेळाव्यात आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी अधिक जोमाने लढण्याचे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना केले.

Shiv Sena UBT leader Chandrakant Khaire criticizes MP Bhausaheb Wakchaure over his absence from the party gathering.
Shivsena News : ऑपरेशन टायगर आधीच एकनाथ शिंदेंना बसणार झटका; विधानपरिषदेला संधी न मिळाल्याने नाराज बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com