Chandrasekhar Bawankule News : मोदींनी केलेला विकास दिसतोय, देशाला सर्वोत्तम करण्याचा त्यांचा प्रयत्न..

BJP : महायुतीचे राज्यातील निवडून आलेले खासदार मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर करून मतदान करतील.
Chandrasekhar Bawankule News
Chandrasekhar Bawankule NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Parbhani : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात देशात केलेले काम दिसत आहे. राज्यातील तीन कोटी लोकांपर्यंत हे काम घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. यासाठी राज्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार घरोघरी जाऊन भेटी देत आहेत. (Chandrasekhar Bawankule News) भारताला सर्वोत्तम देश करण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. परभणी दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

Chandrasekhar Bawankule News
BRS News : केसीआर यांच्या विरोधातील नाराजी जाधवांना भोवली, राज्य समितीत डावलले...

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकांच्या घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या योजना, नऊ वर्षात त्यांच्या सरकारने केलेली कामे याची माहिती देण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज परभणीत या अभियानात सहभाग घेतला. (Parbhani) येणाऱ्या २०२४ मध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले ४५ खासदार हे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करतील, असा दावा देखील त्यांनी केला.

राष्ट्रवादीचा सरकारमध्ये अचानक झालेला सहभाग, संभाजी भिडे यांच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद या विषयावर देखील त्यांनी आपले मत मांडले. (PM Modi) मोदी सरकारने केलेल्या नऊ वर्षांच्या विकास कामांची पावती मतदार त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन दिल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला विकास दिसून येत आहे. आम्ही घरोघरी जाऊन भेटी देत आहोत, सामान्यांची मते जाणून घेत आहोत.

येणाऱ्या काळात भारताला सर्वोत्तम देश करण्याचा मोदीजींचा प्रयत्न आहे. राज्यातील महायुतीचे सरकार चांगले काम करत असल्याचा दावा करतांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे राज्यातील निवडून आलेले खासदार मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर करून मतदान करतील, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला. संभाजी भिडे वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा भाजपशी संबंध जोडणे योग्य नाही. पटोले यांनी सांभाळून बोललं पाहिजे.

संभाजी भिडे यांच्या विधानाची सरकार योग्य चौकशी करेल असे सांगतांनाच यशोमती ठाकूर यांच्या विषयीच्या प्रश्नावर मात्र त्यांनी मला काही बोलायचे नाही, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमधील सहभागाबद्दल विचारले असता, राजकारणाच्या शेवटी सगळेजण देशाचा विचार करतात आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असणारे सगळेच आमच्या सोबत येतील, असे सांगत बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे समर्थन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com