Diliprao Deshmukh : लोकसभेत लातूरची सूत्रं देशमुखांच्याच हाती; बैठकीत काय ठरलं ?

Loksabha Election 2024 : देशमुखांना पक्षाने मोकळीक दिली तर खासदार काँग्रेसचा होणार?
Diliprao Deshmukh
Diliprao DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : अतिशय शिस्तप्रिय, निवडणुका कशा जिंकायच्या याचा दांडगा अनुभव आणि मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमधील देशमुखांच्या हातीच आगामी लोकसभेची सूत्रे असणार आहेत, हे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या विभागीय बैठकीत तशी मागणीच देशमुखसमर्थकांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे केली.

महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh)) यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. सहकार क्षेत्रावर आपली मजबूत पकड कायम ठेवत जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे लातूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी द्या, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. तसेच पक्षाने त्यांना संपूर्ण मोकळीक दिली तरच लातूरचा खासदार काँग्रेसचा असेल, असा दावाही यावेळी करण्यात आला.

Diliprao Deshmukh
Pratap Chikhlikar : खासदार चिखलीकर दोन पावलं मागे; पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यात यशस्वी...

जिल्ह्यातील सगळे गट-तट एकत्र आणून यश मिळवण्याची क्षमता देशमुखांमध्ये असल्याचा सूर बैठकीत निघाला. लातूर म्हटले की माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची राजकीय कारकीर्द आठवल्याशिवाय राहत नाही. निलंगेकर यांनी राज्यपातळीवर काम करण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या सहकार्याने हिरीरीने सहभाग घेतला.

Diliprao Deshmukh
Chandrashekhar Ghule : चंद्रशेखर घुलेंनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू; म्हणाले, 'परिवर्तनासाठी...'

लोकसभेला सतत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पाठीशी राहत विलासराव देशमुख व निलंगेकर यांनी येथील नेतृत्व केले. या नेतृत्वाला कै. शंकरराव चव्हाण यांनी भक्कम साथ दिली, हे विसरता येणार नाही. मागील 2009 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाहेरचा उमेदवार असतानाही येथील लोकसभा एकहाती निवडून आणली होती. या कामासाठी अहोरात्र नियोजन व परिश्रम घेणारे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता, हे आजही त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगतात.

Diliprao Deshmukh
Shiva Murder Case : शिवा वझरकर हत्याकांडाचा तपास रामनगर पोलिसांकडून काढला, आता जबाबदारी एलसीबीकडे !

विलासराव देशमुख यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सगळ्याच लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यामुळे लातूरमध्ये पहिली सभा घेतल्यानंतर संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा दिलीपराव देशमुख यांच्या हाती सोपवण्यात आली होती. एखादी गोष्ट हाती घेतली, की ती पूर्ण केल्याशिवाय न थांबणारा नेता म्हणून दिलीपराव देशमुखांची ओळख आहे. मांजराच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात निर्माण केलेले सहकाराचे जाळे, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत याचा मोठा प्रभाव जिल्ह्याच्या राजकारणावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिलीपराव देशमुखांना मानणारा मोठा वर्ग जिल्हाभरात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले तर निश्चित वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला. ही लोकसभा निवडणूक जिंकायची असेल तर निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी देशमुखांकडे द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Diliprao Deshmukh
Andhare On Rane : 'ये पब्लिक सब जानती है,' राज्यसभेची टर्म संपली म्हणून...; अंधारेंनी मंत्री राणेंना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com