Fake educational institute : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मंत्री-आमदारांना दणका : पाटील, दानवे, मुंडे, सुळे, टोपेंच्या शिक्षण संस्थांमधील बोगसपणावर सर्जिकल स्ट्राईक

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University News : या कॉलेजमध्ये सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जात असल्याचा बोगसपणा उघड झाला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar
Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar Sarkarnama
Published on
Updated on

Chatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चार जिल्ह्यातील नामांकित 113 कॉलेजमधील पदव्युत्तर प्रवेश थांबवले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची समितीमार्फत पाहणी करण्यात आली. त्यामध्ये उच्च शिक्षण मंत्री, इतर मंत्री, आमदार आणि माजी मंत्र्यांशी संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या कॉलेजमध्ये सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जात असल्याचा बोगसपणा उघड झाला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

या कॉलेजमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसतानाही पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणे असे प्रकार सुरू होते. तीन सदस्यीय समितीने केलेल्या तपासणीत हा बोगसपणा उघडकीस आला आहे.


Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar
NCP ministers trouble : : काँग्रेससोबत असो की भाजपसोबत... राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतयं?

मराठवाडयातील चार जिल्ह्यातील ही कॉलेजमध्ये विध्यार्थ्यांना कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, त्यानंतरही या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती. या शिक्षण संस्था उच्च शिक्षण मंत्री, इतर मंत्री, आमदार आणि माजी मंत्र्यांशी संबंधित समावेश आहे. या नेत्याशी संबंधित अशा 113 संस्था असल्याचे उघड झाले आहे.


Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar
Congress Vs Bjp: काँग्रेस भाजपची झोप उडवणार! 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी सपकाळांनी टाकला मोठा डाव; तब्बल 280 जणांची टीम अन्...

विद्यापीठाने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातील अनियमितता समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या या धाडसी निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या कारवाईमुळे शिक्षण संस्थांमध्ये पारदर्शकतेची मागणी वाढली आहे.


Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar
NCP ministers trouble : : काँग्रेससोबत असो की भाजपसोबत... राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतयं?

विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसह व्यवस्थापन परिषदेने 'नॅक' मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजकीय क्षेत्रातील कार्यरत शिक्षण संस्थाचालकांनी 'नॅक'चे कामकाज बंद असल्याचे कारण देत शासनाकडे मुदतवाढ मागितली. त्यानुसार शासनाने 'नॅक' नसलेल्या महाविद्यालयांना सहा महिने मुदतवाढ दिली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची समितीमार्फत पाहणी करण्यात आली.


Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar
Shivsena UBT : दोन जिल्हाप्रमुख एकमेकांचे तोंडही बघत नाहीत; एकच जिल्हाप्रमुख नेमा : ठाकरेंच्या शिवसेनेत खदखद

या नेत्याशी संबंधित कॉलेजांचे प्रवेश रोखले?

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), मंत्री पंकजा मुंडे, हरिभाऊ बागडे , धनंजय मुंडे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री राणा जगजीतसिंह पाटील, माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्याशी संबंधित असलेल्या कॉलेजमधील प्रवेश विद्यापीठाने थांबवले आहेत.


Dr. B.A.M.U. Chatrpati sambhjinagar
Next Vice President : 'बिहार'साठी सारा खेळ! धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 'हा' मोठा नेता उपराष्ट्रपती होणार? केंद्रीय मंत्राने घेतली भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com