Nila Vikhe Patil Sweden Parliament : अहिल्यानगरची लेक थेट स्वीडनच्या संसदेत; विखे पाटलांच्या पुतणीचा दणदणीत विजय

Maharashtra-rooted Green Party leader Nila Vikhe Patil wins from Stockholm City and enters Sweden 349-member Parliament : स्टॉकहोममधून ग्रीन पार्टीच्या नीला विखे पाटील विजयी; निकालानंतर आजोबा बाळासाहेब विखे पाटलांची आठवण काढत म्हणाल्या, ‘त्यांना अभिमान वाटेल असेच काम करेन’
Nila Vikhe Patil
Nila Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Stockholm City constituency : स्वीडनच्या राजकारणात विखे पाटील यांच्या कुटुंबातील कन्या प्रतिनिधीत्व करणार आहे. शिक्षणतज्ज्ञ डाॅ. अशोक विखे पाटील यांची कन्या आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील (वय 41) स्वीडनच्या संसदेवर खासदार म्हणून निवड झाली आहे.

नील यांनी विजयानंतर दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांची आठवण काढली. स्वीडनच्या संसदेच्या निवडणुकीत डाव्या विचारांच्या चार विरोधी पक्षांच्या आघाडीला 176 जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी आघाडीला 173 जागा मिळाल्या आहेत.

नीला विखे यांनी स्टॉकहोम शहर मतदारसंघातून विजय मिळवला असून, त्या आता स्वीडनच्या 349 सदस्यांच्या संसदेत ग्रीन पार्टीचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांचे लहानपण अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) गेले आहे.

विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नीला यांनी आपले आजोबा बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी 15 वर्षांची असताना आजोबा मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला द्यायचे, मी आजोबांना अभिमान वाटेल असेच काम करेन, असे त्या म्हणाल्या.

Nila Vikhe Patil
Sujay Vikhe District Bank : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर सुजय विखेंची भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘मला कुठेच काही व्हायचं नाही’

नीला विखे पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून स्वीडनच्या राजकारणात सक्रिय आहेत. स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात (PMO) वित्त, कर आणि गृहनिर्माण विषयांवर राजकीय सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नीला या स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर निवडून आल्या होत्या. याशिवाय त्यांनी ग्रीन पार्टीच्या संघटनांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

Nila Vikhe Patil
Sanjay Jadhav Cashew Almond Video : दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून वाद; भरणेंचं स्पष्टीकरण, जाधव म्हणाले...

नीला विखे पाटील यांनी गोटेन्बर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्यात पदवी तसेच एमबीए (MBA) केले आहे. याशिवाय मॅड्रिडच्या कॉम्प्ल्युटेन्स विद्यापीठातूनही त्यांनी शिक्षण घेतले आहे. मतदानाचा अधिकार नाही, अशा मुलांच्या कल्याणासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असून, स्वीडनमध्ये राहत असल्या तरी भारताशी आणि महाराष्ट्राशी आपले अतूट नाते कायम राहिल, असे नीला विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com